
पॉचेफस्ट्रूम (दक्षिण आफ्रिका): अंडर-19 महिला T20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि इंग्लंड () यांच्यात होणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध भारताची दमदार कामगिरी आणि शुक्रवारी आठ गडी राखून मिळवलेल्या विजयाने संघाने अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. भारताकडून लेगस्पिनर पार्श्वीने ३ बळी घेतले. न्यूझीलंडने केवळ १०७ धावा केल्या होत्या. सलामीवीर श्वेता सेहरावतने स्पर्धेतील तिसरे अर्धशतक ठोकून धावा करण्याची क्षमता दाखवली आणि ४५ चेंडूत ६१ धावा करत नाबाद राहून १४.२ षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला.कधी होणार फायनल?दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोमांचक विजयश्री खेचून आणली. संघाने केवळ तीन धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारत आणि इंग्लंड या महिलांच्या १९ वर्षांखालील संघांमधील अंतिम सामना रविवारी, २९ जानेवारी रोजी होणार आहे. स्पर्धेच्या या पहिल्या आवृत्तीचा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५.१५ वाजता खेळवला जाईल. १४ जानेवारीपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत १६ संघांनी सहभाग घेतला होता. ४० सामन्यांनंतर अंतिम फेरीचा निर्णय झाला आहे.क्लिक करा आणि वाचा- सामन्याचे अधिकारीही घोषितजेबी मार्क्स ओव्हलवर होणाऱ्या या सामन्यासाठी आयसीसीने अधिकाऱ्यांचीही घोषणाही केली आहे. मॅच रेफरी म्हणून व्हेनेसा डी सिल्वा अंतिम सामन्याची देखरेख करतील, तर कॅन्डेस ला बोर्डे आणि सारा डंबनेवाना मैदानावरील पंच असतील. डेदुनू डी सिल्वा हे टीव्ही पंच असतील. त्याचबरोबर लिसा मॅककेब या चौथ्या पंच असतील.क्लिक करा आणि वाचा- कुठे पाहता येईल लाइव्ह सामना?महिला T20 अंडर-19 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल. यासोबतच फॅनकोडवर सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंगही होणार आहे. उपांत्य फेरीचा सामनाही टेलिव्हिजनवर दाखवला जाईल. हा सामना जिंकणारा संघ पहिला महिला T20 विश्व-19 विश्वचषक जिंकेल.क्लिक करा आणि वाचा-