
नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या व्यवहारांमध्ये सातत्याने सुधारणा होत आहे. आगामी काळात त्यांची कामगिरी आणि मालमत्तेची गुणवत्ता आणखी सुधारेल असा विश्वास आहे. या सुधारणा लक्षात घेऊन जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजने बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) आणि कॅनरा बँक या तीन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी लॉन्ग टर्म लोकल एंड फॉरन करेंसी डिपॉजिट रेटिंगला 'BA1' वरून 'BAA3' वर अपग्रेड केले आहे. रेटिंग एजन्सीने सांगितले की, या बँकांचे क्रेडिट प्रोफाइल मजबूत होत आहे आणि मॅक्रो इकॉनॉमिक स्थिती देखील सुधारत आहे.एसबीआयची रेटिंगया सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे दीर्घकालीन रेटिंग स्थिर असल्याचे मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने एका निवेदनात म्हटले आहे. मूडीजने एसबीआयची दीर्घकालीन स्थानिक आणि विदेशी चलन बँक ठेव रेटिंग BAA3 वर कायम ठेवली आहे, तर इतर तीन बँकांचे दीर्घकालीन ठेव रेटिंग अपग्रेड केले आहेत.कॅनरा आणि पीएनबीचे रेटिंगबँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि पीएनबीचे दीर्घकालीन ठेव रेटिंग BAA1 वरून BAA3 वर श्रेणीसुधारित केले आहे. अहवालानुसार, २०२२ मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी बुडीत कर्जांमध्ये मोठी कपात केली आहे. नफ्यातही दमदार वाढ झाली आहे. हा क्रम २०२३ मध्येही कायम राहण्याची अपेक्षा आहे. व्याजदर वाढल्याने बँकांनाही फायदा होत आहे.सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा बाजारातील हिस्साचालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत म्हणजेच २०२२-२३ मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँकांचा बाजारातील हिस्सा ६० टक्क्यांच्या जवळपास होता. त्यांच्या निव्वळ नफ्यात ३२ टक्के वाढ नोंदवली आणि ती ४०,९९१ कोटी झाली. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत बँकांनी ९१,५०० कोटींचा विक्रमी कर्ज भांडवल दर वाढवला आहे.