
नवी दिल्ली: महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य वाहनचालकाने अलीकडच्या काळात पेट्रोल स्वस्त होईल, अशी अपेक्षा करू नये. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या ताज्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दीर्घकाळापासून स्थिर राहिल्या आहेत, पण इंधन अजूनही महाग आहेत. मात्र, महाग किमतींपासून लवकर दिलासा मिळेल असे वाटत नाही. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नुकतेच एक विधान केले आहे, जे याबाबत सूचित करत आहे.पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले की, सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांचे मागील नुकसान लक्षात घेता पेट्रोलच्या दरात लवकरच कपात होण्याची अपेक्षा नसल्याचे म्हटले. तिन्ही सरकारी तेल कंपन्या - आयओसी, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांनी गेल्या ९ महिन्यांपासून इंधन दरात कोणताही बदल केलेला नाही. खर्चाच्या तुलनेत किमतीत न वाढवल्यामुळे कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.भाव कधी कमी होणार...गेल्या काही महिन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यामुळे भारताच्या सरकारी तेल कंपन्यांवरील दबावही कमी झाला आहे. मात्र, तोटा भरून काढण्यासाठी त्यांनी दरात कोणताही बदल केलेला नाही. तोटा भरून निघाल्यानंतर किमती कमी व्हाव्यात, अशी मला आशा आहे, असे पुरी यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावताना सांगितले.कच्चे तेल महाग तरीही दर स्थिरचपुरी यांनी म्हटले की, रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असतानाही तेल कंपन्यांनी जबाबदारी घेत दर वाढवले नाहीत. त्यांनी किरकोळ दरात वाढ केली नाही. “आम्ही त्यांना दर स्थिर ठेवण्यास सांगितले नाही. त्यांनी स्वतः हा निर्णय घेतला. मात्र, कच्च्या तेलाची जास्त किंमतीने खरेदी केल्याने त्यांची किंमत वाढली. जून २०२२ च्या अखेरीस त्यांना प्रति लिटर पेट्रोलवर १७.४ रुपये तर डिझेलवर २७.२ रुपये तोटा सहन करावा लागला."९ महिन्यांपासून दर 'जैसे थे'पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या वर्षी, ६ एप्रिल रोजी अखेरचा बदल करण्यात आला होता. पुरी म्हणाले की, किमती स्थिर ठेवल्यामुळे तेल कंपन्यांना चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एकूण २१ हजार २०१.१८ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. हे नुकसान अजून भरून निघायचे आहे."