
नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांनी कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या दरवाढीनंतर गुरुवारी क्रूडच्या किंमती घसरल्या आहेत.गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाचे दरांनी ८ टक्क्यांनी वाढले होते, तर चालू आठवड्याच्या सुरुवातीच्या दोन दिवशीही दरांमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. वाढत्या महागाईला आला घालण्यासाठी व्याजदर पाच टक्क्यांच्या वर ठेवण्याची गरज असल्याचे अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या अधिकाऱ्यांच्या विधानंतर बाजारात घसरण दिसून आली.अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूटच्या आकडेवारीनुसार, १३ जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात यूएस क्रूडचा साठा ७.६ दशलक्ष बॅरलने वाढला आहे. यामध्ये सहा लाख बॅरलची कपात होईल, असे मानले जात होते. याशिवाय चीनने देखील करोनाचे निर्बंध शिथिल केल्यामुळे कच्च्या तेलाची मागणी वाढली. लक्षात घ्या की चीन हा जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाची आयात करणारा देश आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या चढ-उतारांचा भारतात सरकारी तेल कंपन्यांच्या दरांवर आजही कोणताही परिणाम झालेला नाही.भारतात पेट्रोल-डिझेलचे दरगुरुवारी देखील सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. देशभरात अखेर ७ एप्रिल रोजी इंधन दर सुधारित करण्यात आले होते. त्यानंतर केंद्र सरकारने देखील मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती.मेट्रो शहरातील इंधन दरमुंबई : पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर, डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटरदिल्ली : पेट्रोल ९६.६५ रुपये प्रति लिटर, डिझेल ८९.८२ रुपये प्रति लिटरचेन्नई : पेट्रोल प्रति लिटर १०२.६३ रुपये, डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटरकोलकाता : पेट्रोल प्रति लिटर १०६.०३ रुपये, डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटरमहाराष्ट्रातील अन्य शहरातील पेट्रोल-डिझेलचे दरनागपूर : पेट्रोल १०६.०४ रुपये प्रति लिटर, डिझेल ९२.५९ रुपये प्रति लिटरपुणे : पेट्रोल १०५.८४ रुपये प्रति लिटर, डिझेल ९२.३६ रुपये प्रति लिटरकोल्हापूर : पेट्रोल १०६.४७ रुपये प्रति लिटर, डिझेल ९३.०१ रुपये प्रति लिटरऔरंगाबाद : पेट्रोल १०८ रुपये, डिझेल ९५.९६ रुपये प्रति लिटरपरभणी : १०९.४५ रुपये प्रति लिटर, डिझेल ९५.८१ रुपये प्रति लिटरनाशिक : पेट्रोल १०६.७७ रुपये प्रति लिटर, डिझेल ९३.२७ रुपये प्रति लिटर