धुळे हादरले! दिवसाढवळ्या भर वस्तीत प्राणघातक हल्ला करून तरुणाला संपवले, शिरपुरात खळबळ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, February 5, 2023

धुळे हादरले! दिवसाढवळ्या भर वस्तीत प्राणघातक हल्ला करून तरुणाला संपवले, शिरपुरात खळबळ

https://ift.tt/tjay0zk
धुळे : घरातील एकुलता एक असलेल्या २२ वर्षीय तरुणाचा भरवस्तीत तिक्ष्ण हत्याराने खून केल्याची खळबळजनक घटना काल शनिवारी, ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. शिरपूर शहरातील शिंगावे गाव शिवारातील बालाजी नगर भागात राहणाऱ्या राहुल राजू भोई या २२ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धारदार शस्त्राने पोटात वार करुन खून करण्यात आला आहे. मयत राहुल भोई याच्या लवर धारदार शस्त्राने घाव घातल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत राहुल भोई याला तातडीने क्रांतीनगर भागातील भद्रा चौक येथून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.क्लिक करा आणि वाचा- शिरपूर रुग्णालयात जमली मोठी गर्दीयावेळी डॉक्टरांनी तपासून राहुल भोई यास मयत घोषित केले आहे. उपजिल्हा रुग्णालयात मयत राहुल भोई याच्या नातेवाईकांनी यावेळी रुग्णालयात एकच आक्रोश केला. खंडेराव महाराज यात्रेच्या पुर्वसंध्येला खूनासारखी गंभीर घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व शोध पथक दाखल होत घटनास्थळी धाव घेतली आहे. शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. क्लिक करा आणि वाचा- यावेळी ज्या व्यक्तीने राहुल याच्यावर वार करून त्याचा खून केला आहे तो व्यक्ती देखील रक्तबंबाड असल्याची माहिती मिळत आहे. मात्र संशयित आरोपी अद्यापही पोलिसांना मिळून आला नसल्याने शिरपूर पोलीस कसून आरोपीचा शोध घेत आहे.क्लिक करा आणि वाचा-