अर्थसंकल्प सादर होण्याआधी या गोष्टी जाणून घ्या; नेमका कधी आणि केव्हा सादर होणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, February 1, 2023

अर्थसंकल्प सादर होण्याआधी या गोष्टी जाणून घ्या; नेमका कधी आणि केव्हा सादर होणार

https://ift.tt/1s5W8p7
नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज १ फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. सकाळी ११ वाजता त्या केंद्रीय सादर करतील. गेल्या दोन अर्थसंकल्पा प्रमाणेच यावेळी देखील अर्थसंकल्प पेपर लेस असेल. २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आधीचा मोदी सरकारचा हा अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प असेल. त्यामुळे या निवडणुकीत मोठ्या घोषणा केल्या जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कुठे पाहू शकाल लाइव्ह बजेट जागतीक बाजारात मंदीचे वातावरण, निवडणुकीचे वर्ष अशा अनेक समोर असताना केंद्रीय अर्थसंकल्प आज सादर होत आहे. अर्थसंकल्पाचे सर्व अपडेट तुम्ही पाहू शकता. या शिवाय पीआयपीच्या youtube चॅनलवर देखील बजेटचे लाइव्ह स्ट्रिमिंग पाहू शकता. तसेच केंद्रीय अर्थसंकल्पाच्या वेबसाइटवर www.indiabudget.gov.in तुम्ही याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. अर्थसंकल्पातून १० अपेक्षा १) २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकारचे हे अखेरचे बजेट आहे. त्यामुळे देशातील जनतेला मोठ्या अपेक्षा असतील. महागाईने त्रासलेल्या जनतेला काही खास गिफ्ट मिळेल अशी आशा आहे. सरकार काही गरजेच्या गोष्टींवर कर कपात करू शकते. २) गेल्या ९ वर्षापासून आयकर मर्यादेत वाढ करण्यात आलेली नाही. नोकरदार वर्गाला यावेळी आयकर मर्यादेत सूट मिळेल अशी आशा आहे. टॅक्स स्लॅबमध्ये बदल होईल याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सध्या असलेली २.५ लाखांची मर्यादा वाढवतील हा हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. ३) लोकांची अपेक्षा आहे की मोदी सरकार त्यांच्य अखेरच्या पूर्ण बजेटमध्ये पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या किमती कमी करेल. ४) ज्येष्ठ नागरिकांना अपेक्षा असेल की त्यांना रेल्वे प्रवासात दिली जाणारी सूट पुन्हा मिळेल. तसेच त्यांच्या आरोग्या संदर्भात काही घोषणा केली जाईल. ५) महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी आयबीआयने या वर्षी रेपो रेटमध्ये वाढ केली होती. ज्यामुळे बँकांनी व्याद दरात वाढ केली होती. आता अर्थसंकल्पात यात काही सवलत मिळेल याची अपेक्षा असेल. ६) किसान सम्मान निधीच्या रक्कमेच वाढ होण्याची आशा आहे. ही रक्कम ८ हजार होऊ शकते. सध्या ही रक्कम ६ हजार इतकी आहे. ७) बजेटमध्ये आरोग्य क्षेत्रा संदर्भात मोठी घोषणा होण्याची आशा आहे. सरकारी रुग्णालयातील व्यवस्थेत सुधारणा करण्या बरोबरच आरोग्यासाठीच्या तरतूदीमध्ये ५ टक्क्यापर्यंत वाढ होऊ शकते. ८) युवकांना रोजगारासंदर्भात ठोस घोषणा होण्याची आशा असेल. ९) देशात आणि विदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिलासा मिळण्याची आशा आहे. शैक्षणीक कर्ज स्वस्त होईल का याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष असेल. १०) या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला दिसाला देणाऱ्या गोष्टींचा विचार केला जाईल अशी आशा आहे. गेल्या काही वर्षापासून प्रवासावरील खर्च वाढत चालला आहे. अशात हा खर्च कमी होईल अशी अपेक्षा असेल.