किंग खानची हवा! टीम इंडियाही झाली शाहरुखची फॅन, तिसऱ्या टी-२० सामन्यापूर्वीचे Photo Viral - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, February 1, 2023

किंग खानची हवा! टीम इंडियाही झाली शाहरुखची फॅन, तिसऱ्या टी-२० सामन्यापूर्वीचे Photo Viral

https://ift.tt/uLD16hM
अहमदाबाद: भारतीय संघ न्यूझीलंडविरूद्धच्या टी-२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. आजचा हा सामना निर्णायक ठरणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या मालिकेतील आतापर्यंतची गुणसंख्या १-१ अशी आहे. त्यामुळे आज जो संघ सामना जिंकेल तो संघ मालिकाही जिंकणार आहे. या तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया अहमदाबाद येथे पोहोचली आहे. १ फेब्रुवारीला हा सामना होण्यापूर्वी टीम इंडियाही शाहरूखची फॅन असल्याचे दाखवून दिले आहे पाहूया काय केले. तिसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी टीम इंडियाभारतीय संघ बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेतील शेवटचा सामना खेळणार आहे. यापूर्वी संघातील खेळाडूंनी शशारूखचा ब्लॉकबस्टर पठाण हा चित्रपट पाहिला. भारतीय संघातील खेळाडूंसाठी चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. कुलदीप यादव, शुभमन गिल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, शिवम मावी आणि राहुल त्रिपाठी यांच्यासह संघातील अनेक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्य सरखेज रोडवरील नवीन फॅन्गल्ड मिनीप्लेक्समध्ये चित्रपटाचा आनंद घेताना दिसले. खेळाडूंचे हे फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. बॉलिवूडचा किंग खान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शाहरुखचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पठाण' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आलेला हा बॉक्स ऑफिसवरील कमाईचे अनेक विक्रम मोडीत काढत आहे. पठाण चित्रपट अवघ्या काहीच दिवसांमध्ये भारतीय चित्रपट सृष्टीतील एक सर्वात मोठ्या चित्रपटाच्या यादीत जाऊन बसला आहे. चित्रपटगृहांमध्ये तर ४ वर्षानंतर आलेल्या शाहरुखला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी लोटली आहे. सर्वसामान्य चाहत्यांपासून आता खेळाडूंना देखील पठाण बघण्याचा मोह आवरला नाही. मालिका निर्णायक वळणावर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिकेतील निर्णायक सामना रंगणार आहे. या मालिकेत सिनियर खेळाडू खेळत नसून हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ मैदानात उतरणार आहे. न्यूझीलंडने रांचीतील पहिला सामना २१ धावांनी जिंकला होता. तर भारतीय संघाने लखनऊमध्ये पुनरागमन करत दुसरा सामना ६ गडी राखून जिंकला. तिसरा सामना जिंकणारा संघ मालिका आपल्या नावे करणार आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवारी संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. हा सामना जिंकणारा संघ मालिकाही जिंकणार आहे. यानंतर टीम इंडिया ९ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या टी-२० मालिकेनंतर भारतीय संघ बराच काळ टी-२० मालिका खेळणार नाही आणि आयपीएलनंतर त्याचे लक्ष आगामी एकदिवसीय विश्वचषकावर असेल, जे भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे.