रत्नागिरी : चिपळूण तालुक्यात विवाहित महिलेवर बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चिपळूण तालुक्यातील तांबी-रामपूर येथील तरुणाला गुरूवारी अटक केली आहे. त्याला चिपळूण न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव राजेश रवींद्र भोसले (३०, मूळगाव- तांबी- रामपूर, सध्या खेर्डी) असे आहे. पीडित ४१ वर्षीय महिलेची या युवकाबरोबर फेसबुकवरून ओळख झाली होती. पीडित विवाहितेला अडचणी सांगून तिच्याकडून त्याने ४० हजार रूपयेही घेतले होते, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. विवाहितेची राजेश याच्याबरोबर फेसबुकवर ओळख झाली. त्यानंतर मोबाईलवर बोलणे, चॅटींग करणे सुरू झाले. यानंतर एके दिवशी पती घरात नसताना आरोपी राजेश हा या महिलेच्या घरात आला. त्यावेळी त्याने बळजबरी करून ११ नोव्हेंबर २०२२ ते १ फेब्रुवारी २०२३ दरम्यान तिच्यावर वारंवार बलात्कार केला.क्लिक करा आणि वाचा- पीडित महिलेला दिली ठार मारण्याची धमकीतसेच कोणाला काही सांगितल्यास पती व मुलाला ठार मारण्याची धमकी दिली.त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या बाबतचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सचिन बारी, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळुंखे अधिक तपास करीत आहेत.क्लिक करा आणि वाचा- त्यामुळे अनोळखी माणसांजवळ वरून संवाद साधताना त्यांच्याशी ओळख करून मैत्री करताना अत्यंत सावध राहणं गरजेचं आहे. चिपळूण येथे घडलेली घटना फेसबुक वर झालेल्या ओळखी मधूनच घडल्याचे पोलीस तपासात पुढे आला आहे. या सगळ्या प्रकारच्या नंतर सोशल मीडिया वरून संपर्क करताना अत्यंत सावध राहण्याची गरज आहे.या प्रकरणी पकडण्यात आलेला संशयित आरोपी कोणताही फार कामधंदा करत नसल्याची माहिती चिपळूण पोलिसांनी दिली आहे.क्लिक करा आणि वाचा-