Gautam Adani News: धक्के पे धक्का! हिंडनबर्गनंतर चीनी पाणी विक्रेत्याने अदानींचा दबदबा संपवला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, February 3, 2023

Gautam Adani News: धक्के पे धक्का! हिंडनबर्गनंतर चीनी पाणी विक्रेत्याने अदानींचा दबदबा संपवला

https://ift.tt/aKv0z3k
नवी दिल्ली: मागील एका आठवड्यात जगभरातल्या टॉप १० अब्जाधीशांच्या यादीत अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर भारत आणि आशियातील एकावेळी सर्वात श्रीमंत असलेले गौतम अदानी यांना धक्के पे धक्का बसत आहे. २५ जानेवारी २०२३ रोजी हिंडेनबर्गने भारतातील प्रभावशाली व्यतींपैकी एक गौतम अदानी आणि अदानी समूहाबाबत एक अहवाल प्रकाशित केला त्यानंतर अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्समधील पडझड अजूनही थांबायचे नाव घेत नाही. याचा फक्त गौतम अदानींना वैयक्तिक पातळीवर बसला आहे.हिंडेनबर्गने आपल्या अहवालात गंभीर आरोप केले ज्यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांचे समभाग घसरत असून कंपन्यांची बाजारातील स्थितीही झपाट्याने घसरत आहे. यामुळे अदानींची निव्वळ संपत्तीत घट नोंदवली जात असून आज शेअर बाजार उघडताच गौतम अदानी यांच्या संपत्तीला आणखी तडा गेला आणि अदानी पहिल्या २० अब्जाधिशांच्या यादीतूनही बाहेर पडले. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत अदानी एकूण ६१.३ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह २१ व्या क्रमांकावर येऊन पोहोचले आहेत.अदानी टॉप२० मधून 'आऊट'ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी $६१.३ अब्ज संपत्तीसह जगातील टॉप 20 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले असून सध्या ते २१व्या क्रमांकावर आहेत. हिंडेनबर्गचा अहवाल येण्यापूर्वी म्हणजे २४ जानेवारी रोजी ते चौथ्या क्रमांकावर होते, तर काही दिवसांनी ते ७व्या क्रमांकावर घसरले होते. तसेच एक दिवस आधी, अदानी जगातील टॉप-१० श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले होते, पण आता त्यांच्यावर टॉप २० मधून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली आहे.उल्लेखनीय आहे की रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानींनी आशियातील सर्वात मोठ्या श्रीमंतांचा मुकुट अदानींकडून हिसकावून तर आता आशियातील दुसऱ्या सर्वात श्रीमंताचा मान चीनमधील एका पाणी विक्रेत्याने हिरावला आहे. फोर्ब्स आणि ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार अदानींना मागे टाकून चिनी अब्जाधीश झोंग शानशान आता आशियातील दुसरे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.फोर्ब्सच्या रिअल टाइम बिलियनेअर इंडेक्सनुसार अदानी २२व्या तर चिनी उद्योगपती १५व्या क्रमांकावर आहेत. याशिवाय ब्लूमबर्गच्या यादीनुसार अदानी २१व्या क्रमांकावर तर झोंग शानशान १४व्या स्थानावर विराजमान आहेत. गेल्या एका वर्षात अदानींचे आशियातील पहिल्या दोन भारतीय अब्जाधीशांचे वर्चस्व दिसून येत होते तर चिनी अब्जाधीश अदानी आणि अंबानींच्या तुलनेत खूप मागे होते. पण आता वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या एकूण संपत्तीत अडीच अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे झोंग चीनमधील एकमेव अब्जाधीश आहेत, ज्यांचा टॉप २० मध्ये समावेश आहे.