पुणे : आपला भलताच हेतू साध्य करून घेण्यासाठी अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक झाल्याच्या अनेक घडना घडलेल्या आपण वाचल्या आहेत. प्रेमाच्या खोट्या शपथा घेऊन केवळ लैंगिक शोषण करण्याच्या हेतूनेही अनेकांनी विवाह केल्याचे स्पष्ट झालेले आहे. मात्र, यापेक्षाही धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. येथे एका मुलीशी बळजबरीने विवाह करत शरीरसंबंधाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तिला ब्लॅकमेल केल्याचा संतापजनक प्रकार पुण्यात घडल्याचे उघड झाले आहे. या पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.या धक्कादायक प्रकरणाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ सुपेकर असे या आरोपीचे नाव आहे. या आरोपी सौरभ सुपेकर याचे पीडित तरूणीशी पूर्वीपासूनची ओळख होती. सौरभने तिला लग्नाची मागणी घातली आणि पुढे लग्नासाठी आग्रहच धरला. ११ ऑक्टोबर २०२१ रोजी सौरभने बळजबरी करत तिच्याशी नोंदणी पद्धतीने विवाह केला. विवाह झाल्यावर सौरभने पीडित तरुणीशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. हे संबंध ठेवतानाचा व्हिडिओच त्याने रेकॉर्ड केला.क्लिक करा आणि वाचा- पुढे सौरभ या व्हिडिओचा वापर तिला धमकावण्यासाठी करू लागला. सौरभ तिच्याकडे पैशांची मागणी करू लागला. जर पैसे दिले नाहीस तर हा व्हिडिओ मी सोशल मीडियावर व्हायरल करीन अशी तो तिला देऊ लागला. या प्रकारामुळे पीडित तरुणी घाबरली. निमूटपणे ती सौरभला पैसे देऊ लागली. असे करता करता या पीडित तरुणीने सौरभला तब्बल १० लाख रुपये दिले.क्लिक करा आणि वाचा- पुढे सौरभने या तरुणीला आपल्या घरी राहायला बोलावलं. मात्र तिने सौरभच्या घरी जाण्यास नकार दिला. मग तो तिच्यावर बळजबरी करू लागला. तिला शिवीगाळही करू लागला. ती जिथे जाईल तिथे तो तिचा पाठलागही करू लागला. या सर्व छळाला कंटाळून शेवटी या पीडित तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेत सौरभविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीत तिने तिचा कसा छळ झाला हे नमूद केलं आहे.ही पीडित तरुणी मंगळवार पेठ येथील रहिवासी असून आरोपी सौरभ सुपेकर हा भवानी पेठेतील रहिवासी आहे. तरुणीची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सौरभला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला.क्लिक करा आणि वाचा-