सर्वसामान्यांना दिलासा! तेलाचे दर उतरले, किलोच्या डब्यामागे 'इतक्या' रुपयांची घसरण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, February 6, 2023

सर्वसामान्यांना दिलासा! तेलाचे दर उतरले, किलोच्या डब्यामागे 'इतक्या' रुपयांची घसरण

https://ift.tt/Mtq1J4W
नाशिक : दैनंदिन वापरातील जवळपास सर्वच वस्तूंच्या दरांत वाढ झाल्याने नाशिककरांना महागाईचा चांगलाच चटका जाणवत असताना खाद्यतेलांचे दर उतरणीला आले आहेत. त्यामुळे वाढत्या महागाईतही सर्वसामान्यांना अल्प दिलासा मिळत आहे. गेल्या आठवड्याभरात खाद्यतेलाच्या पंधरा किलोच्या डब्यामागे शंभर रुपयांची घसरण झाल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.दिवाळीमध्ये खाद्यतेलाच्या मागणीत वाढ झाल्याने दरही प्रचंड उसळले होते. त्यानंतर सातत्याने खाद्यतेलांच्या दरांत चढ-उतार बघायला मिळाली. जानेवारीपासून सोयाबीन आणि शेंगदाणासह इतर तेलबियांचे नवीन पीक बाजारपेठेत दाखल झाल्याने तसेच सद्यस्थितीला खाद्यतेलांची मागणी कमी झाल्याने दर घसरले आहेत. किरकोळ विक्रेत्यांकडे महिनाभरापूर्वी दोनशे रुपये लिटरप्रमाणे विक्री होणारे सूर्यफूल तेल आता १४० रुपये झाले आहे. याचबरोबर सोयाबीन तेल दीडशे रुपये प्रतिलिटरवरून १२० ते १२२ रुपये तर शेंगदाणा तेल १८० रुपये प्रतिलिटरवरून १६० ते १७० रुपये झाले. मागील आठवड्यात खाद्यतेलांच्या दरांत प्रतिकिलो पाच ते सहा रुपयांची घसरण झाली आहे.उपवास महागणारसर्वसामान्य कुटुंबात दररोज सकाळी होणारा पोह्यांचा नाश्ता आता महागला आहे. गेल्या आठवड्यात पोह्यांच्या दरांत दोन रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात पोह्यांचे दर तीन ते चार रुपयांवरून वाढून ५० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहे. येत्या १८ फेब्रुवारीला महाशिवरात्री असल्याने उपवासाचे पदार्थ महागले आहेत. अनेक दिवसांपासून शेंगदाण्याच्याही दरांत वाढ झाली आहे. किरकोळ व्यावसायिकांकडे शेंगदाणे १४५ ते १५० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. तर साबुदाणा गेल्या आठवड्यात ५२ ते ५४ रुपये किलो मिळत होता, या आठवड्यात मात्र साबुदाणा ६५ ते ६८ रुपयांवर गेला आहे.भाजीपाला पुन्हा घसरलागेल्या आठवड्यात भाजीपाल्याची आवक कमी झाली होती. त्यामुळे जवळपास सर्वच भाज्यांच्या दरांत प्रतिकिलो पाच रुपयांची वाढ झाली होती. मात्र, या आठवड्यात आवक सुरळीत झाल्याने दर पुन्हा घसरल्याने नाशिककरांना दिलासा मिळत आहे. बाजारात भेंडी, मेथी, पालक, कारले, गिलके आणि दोडके या भाज्यांच्या दर घसरले आहेत.असे आहेत दरखाद्यतेलसूर्यफूल : २०८०सोयाबीन : १९३५शेंगदाणा : १८५०---भाजीपाल्‍याचे दर (रुपये प्रतिकिलो)भाजी बाजार समिती जत्रा हॉटेल अंबड गंगापूररोडटोमॅटो ५ ते ७ २० ३० ४०वांगी ४० ४० ४० ६०गवार ८० १०० १०० १०० ते १२०भेंडी ४० ते ५० ६० ६० ८०दोडका ४० ते ५० ६० ६० ८०हिरवी मिरची ४५ ५० ५० ८०मेथी १० (मोठी जुडी) १० (छोटी) १० (छोटी) १५ (छोटी)शेपू २० (मोठी) १० (छोटी) १० (छोटी) २० (छोटी)पालक ५ (मोठी) १० (छोटी) १० (छोटी) १० (छोटी)कोथिंबीर २० (मोठी) १० (छोटी) १० (छोटी) १० (छोटी)