Tejaswin Shankar: भारताचा नवा गोल्डन बॉय; तेजस्वीने अमेरिकेत जिंकले सुवर्णपदक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, February 6, 2023

Tejaswin Shankar: भारताचा नवा गोल्डन बॉय; तेजस्वीने अमेरिकेत जिंकले सुवर्णपदक

https://ift.tt/kvzcsYm
बोस्टन: भारताच्या तेजस्वीन शंकरने स्पर्धेत उंच उडीत सुवर्णपदक मिळवले. त्याला शनिवारी झालेल्या या स्पर्धेत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीपासून मात्र दूर राहावे लागले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या २४ वर्षीय तेजस्वीनने २.२६ मीटर कामगिरीसह अव्वल क्रमांक मिळवला. त्याने बहामाच्या डोनाल्ड थॉमस (२.२३ मीटर) आणि अमेरिकेचा डॅरिल सुलिवान (२.१९ मीटर) यांना मागे टाकले. डोनाल्डने २००७ मध्ये जागतिक स्पर्धा आणि २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. कान्सास सिटी विद्यापीठातून पदवीधर झाल्यानंतरची तेजस्वीनची ही अमेरिकेतील पहिलीच स्पर्धा आहे. गतवर्षी त्याने विद्यापीठ स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला होता.वाचा- तेजस्वीनने २.१४ मीटर, २.१९ मीटर, २.२३ मीटर आणि २.२६ मीटर अशी कामगिरी या स्पर्धेत केली. सुवर्णपदक निश्चित झाल्यावर २.३० मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करण्यात तो अपयशी ठरला. त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी २.२९ मीटर आहे. हाच राष्ट्रीय विक्रमही आहे. त्याने सातत्याने २.३० मीटरचा पल्ला गाठल्यास तो पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकू शकतो, असे अभ्यासकांचे मत आहे. ऑलिम्पिक पदकासाठी त्याला २.३६ मीटर कामगिरी करावी लागेल, असा कयास आहे. ‘नव्या वर्षाची झकास सुरुवात. अव्वल खेळाडूंसह स्पर्धा करण्यात मजा आली,’ असे ट्वीट तेजस्वीनने केले.