अमेरिकेत प्रथमच ‘विठ्ठल-रखुमाई’ची प्राणप्रतिष्ठा; शिकागोत जमली भक्तांची मांदियाळी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, March 31, 2023

अमेरिकेत प्रथमच ‘विठ्ठल-रखुमाई’ची प्राणप्रतिष्ठा; शिकागोत जमली भक्तांची मांदियाळी

https://ift.tt/6msz4RQ
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : अमेरिकेतील शिकागोच्या उपनगरात लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची प्रथमच प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्यास शिकागोतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिकागोच्या कालीबारी मंदिरात महाराष्ट्राचे आद्य दैवत व वारकरी संप्रदायाचे कुलदैवत असलेल्या विठुमाऊली व रखुमाईच्या मूर्ती बसवण्यात आली आहे. अमेरिकेतील भक्तांना या दैवताचे दर्शन व्हावे यासाठी खास पंढरपूर येथून मोहक मूर्ती मागविण्यात आली. मोठ्या भक्तिभावात या दोन्ही मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या कार्यक्रमात भाविक देहभान विसरून तल्लीन झाले होते. भजन, कीर्तन, विठ्ठलाची वारी, दिंडी, आरती आणि महाप्रसाद अशा दिवसभर चाललेल्या या सोहळ्यात भक्तगण रमून गेले होते. या कार्यक्रमाचे आयोजन अवधूत दाते, सुजित कुलकर्णी, प्रसाद आथणीकर, माधव गोगावले, उर्मिला दामले, संजीव कुलकर्णी, राहुल सराफ, रवी पोळ आणि कालीबारी मंदिरातील स्वयंसेवक, महाराष्ट्र मंडळातील अनेक भक्तगण व गीताराम दांगट यांनी केले होते.