
मुंबई : बॉलिवूडसाठी आणि कलाकारांसाठी आजची सकाळ एक दुःखद बातमी घेऊन उजाडली आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झाले आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून ही दुःखद बातमी दिली आहे. सतीश कौशिक यांनी अनेक चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका केल्या.'मला माहिती आहे, 'मृत्यू हेच जगाचे अंतिम सत्य आहे!' पण हे गोष्ट आपला जिगरी दोस्त सतीश कौशक यांच्या निधनबद्दल मी लिहिल, याचा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. ४५ वर्षांच्या मैत्रीवर असा अचानक पूर्णविराम!' असं ट्विट करत अनुपम खेर यांनी मित्र सतीश कौशिकबद्दल आपल्या दुःखद भावना व्यक्त केल्या आहेत. सतीश कौशिक यांचे पूर्ण नाव सतीश चंद्र कौशिक असे होते. त्यांच्या जन्म १३ एप्रिल १९५६ मध्ये झाला. ते उत्तम अभिनेत्यासह निर्माते आणि दिग्दर्शक आणि विनोदी कलाकारही होते.