पर्यटनासाठी आलेले दोन तरुण कळंब समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू, एकाला वाचवण्यात यश - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, March 21, 2023

पर्यटनासाठी आलेले दोन तरुण कळंब समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू, एकाला वाचवण्यात यश

https://ift.tt/mhMA2gi
पालघर : पर्यटनासाठी वसईतील कळंब समुद्र किनाऱ्यावर आलेले दोन तरुण समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. यातील एका तरुणाला वाचवण्यात जीवरक्षक व स्थानिक मच्छिमारांना यश आले आहे. तर एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे.नालासोपारा येथील दोन तरुण मित्र वसईतील कळंब समुद्र किनारी रविवारी पर्यटनासाठी आले होते. पर्यटनासाठी आलेले हे दोन मित्र समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र पोहताना समुद्राच्या पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने हे दोघेही तरुण समुद्रात बुडाले. समुद्रात बुडत असलेल्या दोन तरुणांपैकी खामकर नावाच्या एका तरुणाला वाचवण्यात जीवरक्षक व स्थानिक मच्छिमारांना यश आले आहे. मात्र समुद्रात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. साहिल बावकर (वय २१) असे मृत तरुणाचे नाव आहे. साहिल बावकर हा तरुण समुद्रात बुडाल्यानंतर जीवरक्षक रविवारी रात्रीपासून सर्वत्र त्याचा शोध घेत होते. मात्र तो कुठेही आढळून आला नाही. अखेर सोमवारी सकाळच्या सुमारास कळंब येथील रमेश किणी, अभिजित किणी यांना समुद्रात एका जाळ्यात मृतदेह अडकल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. एका लहान बोटीच्या मदतीने हा मृतदेह भुईगांव समुद्र किनारी आणून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.