
दिल्ली : आपल्या प्रेयसीचा बदला घेण्यासाठी तिच्या नावाचे इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट सुरू करत त्याच्या वडिलांच्या फोटोचा वापर करणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. या बनावट अकाउंटद्वारे तो प्रेयसीचे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींमध्ये अश्लील मेसेज पाठवत होता. हा आरोपी तरुण नजफगडचा असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.या घटनेबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, कोणीतरी अनोळखी व्यक्तीने इंस्टाग्रामवर आपले बनावट अकाउंट तयार केले असल्याची तक्रार या पीडित युवतीने दिल्ली पोलिसांना दिली. हा तरुण माझ्या आणि माझ्या वडिलांच्या फोटोंचा चुकीचा वापर करत असल्याचे या तरुणीने सांगितले. हा तरुण या बनावट अकाउंटवरून माझ्या ओळखीच्या लोकांना अश्लील मेसेज पाठवत असल्याची तक्रार या तरुणीने पोलिसांकडे केली आहे. या तरुणीच्या तक्रारीवरून या बाबतच्या गुन्ह्याची नोंद केली असून या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. चार वर्षांनंतर संबंध तुटलेआरोपी तरुणाने बनवलेले हे बनावट अकाउंट विवेक (वय २१) नावाच्या एका तरुणाच्या मोबाइल क्रमांकाचा वापर करून तयार केले होते, अशी माहिती तपासादरम्यान सायबर पोलिसांना मिळाली. त्यानंतर विवेक हा पीडित तरुणीचा प्रियकर होता. त्यांचे गेल्या ४ वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते.काही दिवसांपूर्वी त्यांचे आपसातील बोलणेही बंद झाले होते. त्यानंतर दुखावलेला हा प्रियकर भडकला होता. तेव्हापासून तो सतत या पीडित तरुणीशी संपर्क करण्याच्या प्रयत्नांत होता. मात्र, पीडित तरुणी त्याच्याशी बोलण्यास तयार होत नव्हती. त्यानंतर आरोपीला आपल्या प्रेयसीचा प्रचंड राग आला आणि हिचा आपण बदलाच घ्यायचा, असे त्याने मनाशी पक्के केले. या पीडित तरुणीला बदनाक करण्याची योजना त्याने आखली. त्यानंतर त्याने इंस्टाग्रामवर एक बनावट अकाउंट सुरू केले. त्याद्वारे तो पीडित तरुणीच्या नातेवाईकांना आणि मित्र- मैत्रिणींना अश्लील मेसेज पाठवू लागला. विकृत प्रियकराला पोलिसांनी केली अटकहा आरोपी तरुण दक्षिण-पश्चिम दिल्लीच्या नजफगड परिसरात राहणारा असल्याची माहिती पोलीस आयुक्त (द्वारका) एम. हर्षवर्धन यांनी माहिती देताना सांगितले. या आरोपी तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याबरोबर या तरुणाचा मोबाइलही पोलिसांनी जप्त केला आहे.