
प्रयागराज: ज्या निष्पाप जीवाला घेऊन आशेची स्वप्ने दाखवून आपल्या घरी आणतो, त्याच्यावरच अघोरी अत्याचार करण्याइतका कोणी निर्दयी असू शकतो का? पण अशीच एक घटना प्रयागराजमध्ये घडली आहे. एका महिलेने ७ वर्षांच्या निष्पाप मुलीवर एवढा निर्दयी अत्याचार केला की ऐकणाऱ्याचे हृदय फाटते. या निर्दयी महिलेने त्या मुलीला ठिकठिकाणी इस्त्रीने जाळले, काठीने मारहाण केली, तिचा हात कोपरापासून तोडला. एवढ्यावरही तिचे समाधान झाले नाही तेव्हा तिने मुलीच्या गुप्तांगात लाकूड घातले. लष्करी डॉक्टरांच्या प्रयत्नानंतर या मुलाची प्रकृती काहीशी सुधारली आहे ही त्यातल्यात्यात दिलासा देणारी बाब आहे.शनिवारी कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान एक्स-रे करण्यासाठी आलेल्या डॉक्टरांनी मुलीच्या जखमा पाहिल्या आणि त्यांना संशय आला. त्यानंतर हा क्रूरपणा उघडकीस आला. निष्पाप मुलीच्या अंगावरील जखमा आणि कोपरापासून तुटलेला हात भयानक अत्याचाराची कहाणी सांगत होता. कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनाही बसला धक्काडॉक्टरांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या मुलीबाबत माहिती दिली. महिला डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली असता, जे समोर आले ते समजताच रुग्णालयातील संपूर्ण कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला. ७ वर्षीय मुलीच् गुप्तांगातून रक्त वाहत होते. ते तिने लपवण्याचा प्रयत्न केला. कपडे बाजूला करताच रक्त येऊ लागले. त्यानंतर लगेच उपचार सुरू झाले. रक्तस्त्राव थांबवण्यात डॉक्टरांच्या पथकाला यश आले. उपचारानंतर मुलीची प्रकृती आता चांगली आहे.मुलीवर अत्याचार करणाऱ्या महिलेने चुकीची माहिती दिलीज्या महिलेने या मुलीवर अत्याचार केले त्याच महिलेने आणि तिच्या पतीने मुलीला हॉस्पिटलमध्ये नेले, अशी माहिती कन्टोनमेंट रुग्णालयाने दिली. रुग्णालय आणि डॉक्टरांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी घरातील मुलांमध्ये भांडण झाल्याचे सांगितले. लहान भावाने मुलीला मारल्यानेतिच्या हाताला दुखापत झाली. त्याचा एक्स-रे काढण्यासाठी आलो आहोत, असे या अत्याचारी जोडप्याने रुग्णालयाला सांगितले. दिल्लीतील एका अनाथाश्रमातून या मुलीला दत्तक घेण्यात आले होतेकॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलचे मॅनेजमेंट प्रभारी सिद्धार्थ यांनी माहिती देताना सांगितले की, चौकशी केल्यावर असे आढळून आले की महिलेचा पती, (सन साइन अपार्टमेंट, प्रीतम नगर, धुमानगंज पोलिस स्टेशन परिसरातील रहिवासी) आर्मी स्कूलमध्ये शिकवतो. त्यांनी दिल्लीतील एका अनाथाश्रमातील एका मुलीला दत्तक घेतले. आरोपी दाम्पत्याला अटकधूमनगंजचे एसएचओ राजेश कुमार मौर्य यांनी सांगितले की, मुलीवर क्रूर अत्याचार आणि वाईट वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत आहे. आरोपी महिला आणि तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे. हे क्रूर दांपत्य मुलीला नोकरासारखे घरगुती काम करायला लावायचे. काम करत नाही म्हणून धमक्याही ते देत असत, असे पोलिसांना तपासात आढळले. या प्रकरणी पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.