महामार्गावर रस्ता ओलांडताना तोल गेला, त्याचवेळी कंटेनरची धडक, मद्यधुंद तरुणाचा जागीच जीव गेला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, March 30, 2023

महामार्गावर रस्ता ओलांडताना तोल गेला, त्याचवेळी कंटेनरची धडक, मद्यधुंद तरुणाचा जागीच जीव गेला

https://ift.tt/THGCIPJ
अमरावती: मद्यप्राशन करून महामार्ग ओलांडणाऱ्या अज्ञात इसमाला भरधाव कंटेनरने चिरडल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास बोरगाव धर्माळे येथील हॉटेल किशन (बाप्पू चा ढाबा) समोर घडली. घटनेनंतर कंटेनर चालकाने वाहन न थांबवता तेथून पोबारा केला आहे. नांदगाव पेठ पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर मृतकाची ओळख पटलेली नव्हती.दुपारच्या सुमारास एक अनोळखी इसम बोरगाव धर्माळे येथील महामार्गावर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये मद्यप्राशन करण्यासाठी गेला होता. तेथून परत जात असताना महामार्गावरून दुभाजक ओलांडतांना तो तोल जाऊन खाली पडला आणि दरम्यान नागपूरकडे भरधाव जाणाऱ्या कंटेनर खाली आला. भरधाव कंटेनरचे चाक डोक्यावरून गेल्याने तो जागीच गतप्राण झाला. कंटेनर चालकाने घटनेनंतर वाहन न थांबवता थेट नागपूरच्या दिशेने सुसाट वाहन काढून पोबारा केला.घटनेनंतर बघ्यांची एकच गर्दी झाली. नांदगाव पेठ पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला व मृतदेह तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला. मृतकाची ओळख पटवण्याचे काम पोलिसांच्या वतीने सुरू असून फरार कंटेनर चालकाचा शोध देखील पोलीस घेत असल्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी सांगितले.अवैध देशी दारू विक्रीचा अड्डामहामार्गालगत मोठ्या प्रमाणत अवैधरित्या देशी दारूची विक्री होत असून आजूबाजूचे मद्यपी याठिकाणी येतांना महामार्ग ओलांडून येतात. अनेकदा याठिकाणी किरकोळ अपघात झाले असून प्रशासनाने याबाबत दखल घेणे गरजेचे झाले आहे.