Petrol Diesel Rate Today: कच्च्या तेलाच्या किमतीत घट, तुमच्या शहरात इंधन स्वस्त झालंय का? जाणून घ्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, March 30, 2023

Petrol Diesel Rate Today: कच्च्या तेलाच्या किमतीत घट, तुमच्या शहरात इंधन स्वस्त झालंय का? जाणून घ्या

https://ift.tt/BJWFA32
नवी दिल्ली : बुधवारचा दिवस देशातील काही राज्यातील वाहन चालकांसाठी किंचित दिलासा घेऊन आला आहे. कच्च्या तेलाच्या किमतींच्या आधारे देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज सुधारित केल्या जातात. अशा स्थितीत आज अनेक शहरांमध्ये वाहन इंधन दरात कपात होताना दिसत आहे. दिल्लीला लागून असलेल्या नोएडा, गुरुग्राम या शहरांमध्ये आज वाहन इंधन दारात किरकोळ घट झाली आहे. त्याचवेळी आज काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ नोंदवली जात आहे.सरकारी तेल विपणन कंपन्या देशभरात दररोज पेट्रोल-डिझेलचे दर अपडेट करतात. मात्र, अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असताना देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.कच्च्या तेलाची किंमतभारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता जाहीर होतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे या किमती निश्चित केल्या जातात. आज कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत असून ब्रेंट क्रूड ऑइल ०.०५% किंचित घसरणीसह प्रति बॅरल $७८.२४ वर व्यवहार करतंय तर WTI क्रूडच्या किंमतीत ०.०७ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $७३.०२ च्या आसपास व्यवहार करत आहेत. अशा स्थितीत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर स्पष्टपणे दिसून येत आहे. तर अनेक शहरांमध्ये इंधनाचे दर कमी झाले आहेत.तुमच्या शहरातील सुधारित दर SMS द्वारे तपासावाहनचालक घरून बाहेर पडण्यापूर्वी फक्त एका एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर तपासू शकतात. राज्यस्तरीय करांमुळे प्रत्येक शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांनी त्यांच्या शहरातील वाहन इंधनाचे दर तपासण्यासाठी RSP कोड ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवायचा, ज्यानंतर तेल कंपनी तुम्हाला एसएमएसद्वारे तुम्ही किंमती कळवतील.