Pune : दबक्या पावलांनी आला, नरडं धरलं, बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर हल्ला; थरारक VIDEO - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, March 18, 2023

Pune : दबक्या पावलांनी आला, नरडं धरलं, बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर हल्ला; थरारक VIDEO

https://ift.tt/7swbnm6
पुणे : बिबट्याचा वावर आता शहरी भागात होऊ लागल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातील हिंजवडी येथील इन्फोटेक परिसरात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. हिंजवडी आयटी पार्कजवळील नेरे गावातील एका शेतकऱ्याच्या पाळीव कुत्र्यावर पहाटेच्या वेळी एका बिबट्याने हल्ला करून त्यासा ठार केले. पाळीव कुत्रा स्थानिक शेतकरी संभाजी जाधव यांच्या घरातील असल्याची माहिती पुण्याच्या वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे या परिसरात बिबट्याची दहशत वाढू लागली आहे.हिंजवडी येथे घराच्या बाहेर बांधून ठेवलेल्या एका पाळीव कुत्र्याचा बिबट्याने फडशा पाडला. त्याच्या हल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचे वास्तव्य वाढू लागले आहे. रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर पडणे देखील अवघड झाले आहे. त्यामुळे वन विभागाने या घटनेची दखल घेऊन तरी पिंजरा लावून बिबट्याला पकडावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शहरी भागात बिबट्याचा दर्शन होऊ लागल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील तालुक्यानंतर आता हिंजवडी परिसरातील नेरे, जांबे आणि कासार साई या ठिकाणी बिबट्याचे वास्तव्य वाढू लागले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये दिवसेंदिवस भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. कारण दिवसाढवळ्या बिबट्या या ठिकाणी नागरिकांना दर्शन देत असल्याचे पहायला मिळत आहे. बिबट्यांना जंगले कमी झाल्याने बिबट्या मानवी वस्तीकडे वाटचाल करू लागला आहे. त्यामुळे वन विभागाने या ठिकाणी तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. नाहीतर माणसाचा जीव गेल्यावर पिंजरा लावण्यात काही उपयोग नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.