
नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या दरात आजही चढ-उतार सुरूच आहेत. दरम्यान, सरकारी तेल विपणन कंपन्यांनी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सुधारित केल्या आहेत. गेल्या काही काळापासून अमेरिका आणि जागतिक बँकांच्या आर्थिक संकटामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण होत आहे. तसेच शुक्रवारबद्दल बोलायचे झाले तर आजही क्रूड ऑइलच्या किंमतीतील चढउतार सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव पुन्हा एकदा ८० डॉलर प्रति बॅरलच्या खाली घसरला असून लवकरच देशातील सर्वसामान्य वाहनचालकांना पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दिलासा मिळण्याची शक्यता आहे.आजचा क्रूड आणि पेट्रोल-डिझेलचा भाववाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव आजही घसरणीसह व्यवहार करत आहे. WTI कच्च्या तेलाच्या किमतीत ०.०६ टक्क्यांची किंचित घट झाली आहे तर, ब्रेंट क्रूड ऑइलचा मात्र भाव स्थिर राहिला आहेत. डब्ल्यूटीआय कच्चे तेल प्रति बॅरल $६८.३१ तर ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल $७४.७० वर व्यवहार करत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उताराचा परिणाम आज देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर होताना दिसत नाहीये. चार महानगरांसोबतच इतर अनेक शहरांमध्ये वाहन इंधनाचे दर स्थिर आहेत.महानगरांमध्ये तेलाचा दरइंडियन ऑइल कॉर्पोरेशनची (IOCL) अधिकृत वेबसाइट iocl.com च्या ताज्या अपडेटनुसार राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत ९६.७२ रुपये प्रति लिटर तर डिझेलची किंमत ८९.६२ रुपये प्रति लीटर आहे. तसेच मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०६.३१ रुपये आणि डिझेलचा दर ९४.२७ रुपये प्रतिलिटर आहे.आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या आधारावर तेल विपणन कंपन्या दररोज राष्ट्रीय पातळीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. तुमच्या शहरातील वाहन इंधनाचे दर तुम्ही एका SMS द्वारेही जाणून घेऊ शकता. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच सर्वसामान्यांना अधिक पैसा देऊन ते खरेदी करावे लागते.