अंतिम सामन्याचा रोमांच! शेवटच्या चेंडूवर ४ धावांची गरज; पुढे काय घडलं पाहा VIDEO - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, March 19, 2023

अंतिम सामन्याचा रोमांच! शेवटच्या चेंडूवर ४ धावांची गरज; पुढे काय घडलं पाहा VIDEO

https://ift.tt/2Z3mEKC
नवी दिल्ली: पाकिस्तान सुपर लीग २०२३ चा विजेतेपदाचा सामना शनिवारी लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर गतविजेता लाहोर कलंदर आणि गत उपविजेता मुल्तान सुलतान यांच्यात खेळला गेला. अटीतटीच्या या सामन्यात लाहोर कलंदरने शेवटच्या चेंडूवर शानदार कामगिरी करत विजय मिळवला. शेवटच्या चेंडूवर ४ धावांची गरज असताना नेमकं काय घडलं पाहूया. मिराज बेग आणि फखर जमान यांनी लाहोरला चांगली सुरुवात करून दिली, पण मिराज ३८ धावांवर बाद झाला. त्यानंतर अब्दुल्ला शफीकने वेगवान धावा करत धावसंख्या ११ षटकांत ९० पर्यंत नेली. अखेरच्या षटकांत शाहीन आफ्रिदीने ४४ धावांची धडाकेबाज खेळी करत धावसंख्या २०० पर्यंत नेली.२०१ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना मुलतान सुलतान्सची सुरुवात चांगली झाली आणि कर्णधार रिझवाननेही शानदार खेळी केली. तो बाद झाल्यानंतर रिले रुसोने अर्धशतक झळकावले. त्यानंतर शाहीन आफ्रिदीने आपल्या शानदार गोलंदाजीने मुलतानला बॅकफूटवर आणले. शेवटच्या षटकात मुलतान सुलतान्सला विजयासाठी १३ धावांची गरज होती. ज्यात जमान मुलतानकडून गोलंदाजीसाठी आला होता. त्याने सामन्याच्या शेवटच्या षटकातील पहिल्या ५ चेंडूत ९ धावा दिल्या. तिसऱ्या चेंडूवर धावबाद होण्याची शक्यता होती, पण चेंडू स्टंप्सच्या बाजूने गेला. मुलतान सुलतानकडून ५व्या चेंडुवर चौकार लगावला. आणि त्यामुळे त्यांना शेवटच्या चेंडूवर चौकाराची गरज होती, जो खुशदिलला मारता आला नाही. चेंडू त्याने सीमारेषेकडे पाठवला खरा पण चौकारासाठी जाऊ शकला नाही. त्यामुळे लाहोर संघाने हा सामना एका धावेने जिंकला.लाहोर कलंदरने या विजयासह, सलग दोनदा पीएसएलएल ट्रॉफी जिंकणारा पहिला संघ ठरले आहत. या सामन्यात लाहोर कलंदरचे कर्णधारपद शाहीन आफ्रिदीकडे होते तर मुलतान सुलतान संघाची कमान मोहम्मद रिझवानकडे होती. विजेतेपदाच्या सामन्यात लाहोरने नाणेफेक जिंकून २० षटकांत ६ बाद २०० धावा केल्या. प्रत्युत्तरात मुलतानचा संघ २० षटकांत ८ बाद १९९ धावाच करू शकला.