महाबळेश्वरच्या जंगलात मादी रानगव्याचा मृत्यू, प्रसूतीदरम्यान दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, March 19, 2023

महाबळेश्वरच्या जंगलात मादी रानगव्याचा मृत्यू, प्रसूतीदरम्यान दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ

https://ift.tt/du6kH28
सातारा : प्रसूतीच्या वेदना किती भयंकर असतात, हे त्या नवजात बालकास जन्म देणाऱ्या मातेलाच कळतं. मग तो मानव असो किंवा जंगली प्राणी असो किंवा पाळीव प्राणी असो. बाळाला जन्म देताना प्रसव कळा किती सोसाव्या लागतात हे त्या आईलाच कळते. खरंतर हा त्या स्त्रीचा अथवा मादीचा पुनर्जन्मच असतो. अशीच एक हळहळ व्यक्त करणारी घटना घडली आहे. या ठिकाणी मानव जातीबाबत ही घटना घडली असती तर तिला चांगल्या चांगल्या मोठ्या हॉस्पिटल किंवा डॉक्टरकडे घेऊन उपचार केले असते. ज्याच्याबाबत ही घटना घडली तो आहे मुका प्राणी रानगवा. तो आपली वेदना इतरांना कशी काय सांगू शकेल! निसर्गाने प्रत्येक स्त्री लिंग वर्गीय प्राण्याला नैसर्गिकरित्या प्रसव होण्याची देणगी दिलीय. मानव जात सोडली तर वन्य प्राण्यांची प्रसूती होताना त्यांना किती मरण यातना सहन कराव्या लागतात हे या घटनेवरून निदर्शनास येते.महाबळेश्वर तालुक्यातील कासवंड वनक्षेत्रात येथील वनक्षेत्रात मादी रानगव्याचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना घडलीय. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीअंती मादी रानगव्याचा प्रस्तुतीदरम्यान मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केलाय. या घटनेने वन्य प्रेमीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.कासवंड वनक्षेत्रात नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी अभिषेक पवार हा युवक कासवंडच्या पश्चिमेकडे असलेल्या तांबुटा वनक्षेत्रात भटकंतीसाठी गेला असता होता. त्यावेळी भलामोठा वन्यप्राणी मृतावस्थेत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. जवळ जाऊन पाहिले असता तो रानगवा असल्याची खात्री झाली. हा सर्व प्रकार त्याने घरी येऊन वडील वन्यजीवप्रेमी सर्जेराव पवार यांच्या कानी घातला. त्यांनी लागलीच वन खात्याशी संपर्क साधून वन अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून शुक्रवारी रात्री उशिरा वन अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी तसेच वन्यजीवप्रेमी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून घटनेचा पंचनामा करीत तपासणी आली. यामध्ये वनअधिकारी व पशूवैद्यकीय अधिकारी जितेंद्र पाठक यांनी गव्याच्या मृतदेहाची तपासणी करून नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न केला. हा रानगवा मादी पैलारू असून प्रसूती दरम्यान गर्भाशय फाटल्याने मरण पावल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. हे वनक्षेत्र दुर्गम असल्याने जवळपास वाहन साधने उपलब्ध नसल्याने त्याच ठिकाणी रानगवा मादीवर दहन करण्यात आले. या संबंधित घटनेवर पर्यावरण तसेच वन्यप्रेमींकडून हळहळ व्यक्त होत आहे.