
जशपूर: पती आणि पत्नीमध्ये शारीरिक संबंधांवरुन वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की पत्नीने रागाच्या भरात आत्महत्या करण्यासाठी विहिरीत उडी घेतली. त्यानंतर पतीने पत्नीला आत्महत्या करण्यापासून वाचवलं. पण, नंतर त्याने तिच्या गुप्तांगात लाकूड घातलं. त्यानंतर तिची हत्या केली. ही धक्कादायक घटना छत्तीसगडमधील जशपूरमध्ये घडली आहे. येथे मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पतीने पत्नीला शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. संतापलेल्या पत्नीने आत्महत्या करण्यासाठी विहिरीत उडी घेतली. पतीने पत्नीला विहिरीतून बाहेर काढले आणि तिचे प्राण वाचवले. त्यानंतर विहिरीजवळच त्याने पत्नीच्या गुप्तांगात लाकूड टाकलं आणि मग तिला इतकी मारहाण केली की तिची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.हे संपूर्ण प्रकरण बागिचा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रौनी गावातील आहे. येथे राहणारा शंकर राम नावाचा व्यक्ती पत्नीसोबत राहत होता. दोघांनाही अपत्य नाही. पती-पत्नी दारू पिऊन घरी परतले होते, असे सांगितले जात आहे. जेवण करून दोघे झोपायवा गेले. त्यावेली शारीरिक संबंध ठेवण्यावरून दोघांमध्ये वाद झाला.शारीरिक संबंध ठेवण्यास पत्नीचा नकारयादरम्यान, पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. पतीने पुन्हा पुन्हा आग्रह केला पण पत्नीने वारंवार नकार दिला. वाद वाढल्यानंतर पत्नीने विहिरीत उडी घेतली. यानंतर पतीनेही उडी मारून तिला विहिरीतून बाहेर काढले. तिला विहिरीतून बाहेर काढल्यानंतर पतीने क्रौर्याची परिसीमा ओलांडली.संतापलेल्या पतीने पत्नीच्या गुप्तांगात लाकूड टाकले. यानंतर आरोपीने पत्नीची हत्या केली. रात्रभर तो पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून राहिला. सकाळी पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी पतीला अटक केली. अटकेनंतर पतीने सांगितलं की पत्नीने स्वतः विहिरीत उडी घेतली. तसेच, त्याने पत्नीच्या गुप्तांगात लाकूड टाकल्याचं सांगितलं. आरोपी पतीने पोलिसांसमोर हत्येची कबुली दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत यासोबतच मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.