VIDEO: इशान किशनने मारला रॉकेट शॉट, चेंडू रोहितच्या पायाला लागला आणि…. - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, April 19, 2023

VIDEO: इशान किशनने मारला रॉकेट शॉट, चेंडू रोहितच्या पायाला लागला आणि….

https://ift.tt/lcK16Js
हैदराबाद: आयपीएल २०२३ मध्ये आज मंगळवारी हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर एक अतिशय रोमांचक सामना खेळला जात आहे. मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळल्या जात असलेल्या या सामन्यात हैदराबादचा कर्णधार एडन मार्करम याने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत १९२ धावांचा डोंगर उभारला आहे. पण प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मासोबत ईशान किशनने असं काही केलं की तो मैदानातच पडला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी केली. मात्र, रोहित शर्मा पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला आणि २८ धावा करून टी नटराजनचा बळी ठरला. दरम्यान, मैदानावर एक विचित्र घटना पाहायला मिळाली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.हैदराबादचा वेगवान गोलंदाज मार्को जॅनसेन गोलंदाजी करत होता. समोर ईशान स्ट्राइकवर होता, मार्कोने सरळ चेंडू टाकला जो ईशानने समोरच्या दिशेने ताकदीने खेळला. चेंडू थेट रोहितच्या डाव्या पॅडवर गेला. रोहितने चेंडूच्या दिशेपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला पण तरीही तो चेंडूपासून दूर जाऊ शकला नाही. चेंडू इतका वेगवान होता की रोहितला चेंडू लागताच तो मैदानातच पडला. मात्र, त्याला दुखापत झाली नाही. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच वेळी, रोहितने त्याच्या २८ धावांच्या खेळीत आयपीएल कारकिर्दीतील ६००० धावांचा टप्पाही पूर्ण केला. ही कामगिरी करणारा तो विराट कोहली, शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नरनंतरचा चौथा खेळाडू ठरला आहे. रोहितच्या या ६००० धावांपैकी ३८८० धावा नॉन ओपनर म्हणून झाल्या आहेत. इशान किशनने ३८ आणि कर्णधार रोहित शर्माने २८ धावा केल्या. तिलक वर्माने अवघ्या १७ चेंडूत ४ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या. तिलकशिवाय कॅमेरून ग्रीनच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने धावांचा डोंगर उभारला. तर दुसऱ्या डावाला सुरुवात होताच बेहरेनडॉर्फने मुंबईला दोन विकेट मिळवून दिले आहेत.