रत्नागिरी शहर परिसर हादरला; मित्रानेच केले मित्रावर सुरीने सपासप जीवघेणे वार, कारण काय? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, April 12, 2023

रत्नागिरी शहर परिसर हादरला; मित्रानेच केले मित्रावर सुरीने सपासप जीवघेणे वार, कारण काय?

https://ift.tt/aT9We5S
रत्नागिरी : गेले काही दिवस रत्नागिरी शहर परिसरात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र पुन्हा एकदा शहराजवळच जीवघेणा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. शहरानजिकच्या खेडशी परिसरात घरगुती वादातून मित्रानेच मित्रावर धारदार सुरीने सपासप वार करत जीवघेणा हल्ला केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना रत्नागिरी शहराजवळ रात्री आठ ते नऊच्या सुमारास घडली आहे. रेहान बाबामियॉं मस्तान हा सराईत गुन्हेगार असून तो गेले काही दिवस राहत असलेल्या मित्राजवळ दोघांमध्ये भांडण चालू होते. रेहान याच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. विनायक हेडगे याने रेहानवर तब्बल सात वार केले आहेत. या जीवघेण्या हल्यात रेहान हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचाराकरता कोल्हापूर येथे हलवण्याची तयारी करण्यात आली आहे. गेले काही दिवस या दोघांमध्ये वाद सुरू होते. घरगुती कारणातून हे वाद सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मंगळवारी रात्री विनायक हेडगे याने घरी आल्यानंतर रेहानवर जीवघेणे वार केले आहेत. रेहान बाबामियॉं मस्तान व विनायक हेडगे हे एकमेकांचे मित्र असून गेले काही दिवस हेडगे यांच्याकडे रेहान हा वास्तव्यास आहे. विनायक वार करत असतानाच बचाव करताना रेहान याने आपल्याकडील चाकूने विनायक याच्या हातावर चाकू मारला. पण तरीही विनायक याने रेहान याच्यावरती सुरीने सपासप वार केले आहेत. या दोघांमधील कौटुंबिक वादातूनच हा सगळा धक्कादायक प्रकार घडला असावा असा पोलिसांकडून प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी घेतली घटनास्थळी धावहा जीवघेणा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला याची नेमकी माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. दरम्यान या सगळ्या धक्कादाय प्रकाराची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रत्नागिरी पोलिसांकडून सुरू आहे.