पिंटूंची कामगिरी लय मोठी; टीसीची संपूर्ण रेल्वेत चर्चा; किती दंड जमा केला? माहित्येय का? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, April 1, 2023

पिंटूंची कामगिरी लय मोठी; टीसीची संपूर्ण रेल्वेत चर्चा; किती दंड जमा केला? माहित्येय का?

https://ift.tt/IZ2p3TO
दिल्ली: तिकीट न काढता प्रवास करणाऱ्यांना सर्वाधिक भीती वाटते ती टीसीची. विनातिकीट प्रवासी करणाऱ्यांची नजर टीसींना शोधत असते आणि टीसींची नजर अशा प्रवाशांना. विनातिकीट प्रवाशांना अचूक हेरण्याला कौशल्य लागतं. अनेक टीसींना प्रवाशांच्या हालचालींवरूनच संशय येतो. मग टीसी तिकीट, पास दाखवायला सांगतात आणि प्रवाशांचा करेक्ट कार्यक्रम होतो. असे कार्यक्रम करण्यात आग्नेय रेल्वेचे पिंटू दास अगदी हुशार आहेत. (टीसी) यांनी गोळा केलेल्या दंडातून रेल्वेला मोठा महसूल मिळतो. आग्नेय रेल्वेच्या हावडा खडगपूर विभागातल्या पिंटू दास यांनी आर्थिक वर्षात (२०२२-२३) मध्ये १ कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल केला आहे. याबद्दलची अधिकृत माहिती आग्नेय रेल्वेनं दिली आहे. हावडा खडगपूर विभागातील संतरागाछी स्थानकात तैनात असलेल्या पिंटू दास यांनी २६ मार्च २०२३ पर्यंत दंड स्वरुपात एकूण १ कोटी ५३ हजार ४०० रुपये गोळा केले. आग्नेय विभागातील इतर कोणत्याच टीसीला दास यांच्याइतका दंड गोळा करता आलेला नाही. पिंटू दास लांब पल्ल्यांच्या गाड्यांसोबतच हावडा-खडगपूर, खडगपूर-बालेश्वर, हावडा-दिघा, शालिमार-टाटा सेक्शन या दरम्यान धावणाऱ्या लोकल गाड्यांमध्येही दास तिकीट तपासणीस म्हणून काम करतात. आपल्या कामगिरीमागे अनेकांचा वाटा असल्याचं दास सांगतात. वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक राजेश कुमार यांच्याकडून प्रेरणा घेत असल्याचं दास म्हणाले. मला सगळ्या प्रभारी आणि कर्मचाऱ्यांकडून मदत मिळते. सगळ्यांच्या सहाय्यामुळेच मला यश मिळालं आहे. सर्वांनी केलेल्या सहकाऱ्यामुळेच मी विभागात पुढे जाऊ शकलो, अशा शब्दांत पिंटू दास यांनी त्यांच्या वरिष्ठ आणि सहकाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आग्नेय रेल्वेनं गेल्या वर्षभरात १ लाख १६ हजार प्रवाशांकडून दंड वसूल केला आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एकूण ९.६२ कोटी रुपयांचा दंड गोळा करण्यात आला आहे. या विभागातील एकूण ९ टीसींनी १ कोटीपेक्षा अधिकचा दंड वसूल केला आहे. त्यात सिकंदराबाद विभागाचे मुख्य तिकीट निरीक्षक आघाडीवर आहेत. त्यांनी १२ हजार ६८९ प्रवाशांकडून १.१६ कोटी रुपयांचा दंड गोळा केला आहे.