धक्कादायक! ती तरुणी बेरोजगार होती, हे हेरून कथित समाजसेवकाने नोकरीचे आमिष दाखवत केला अत्याचार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, April 27, 2023

धक्कादायक! ती तरुणी बेरोजगार होती, हे हेरून कथित समाजसेवकाने नोकरीचे आमिष दाखवत केला अत्याचार

https://ift.tt/UVTncPz
: शहरातील २९ वर्षीय तरुणीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून स्वतः समिती समाजसेवक म्हणून मिरवणाऱ्या एका नराधमाने तरुणीवर वेळोवेळी शारीरिक केला. तरुणीवर अत्याचार करण्याचा व्हिडिओ तयार करत नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देणाऱ्या तरुणाच्या विरोधात मंगळवार, दिनाक २५ एप्रिल रोजी जिन्सी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सय्यद जावेद सय्यद जफर (वय ३१ वर्षे, रा. रहीमनगर, गल्ली नंबर- ३, अल्तमास कॉलनी) असे अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. सय्यद जावेद हा एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत करतो. यातून तो समाजसेवक म्हणून समाजामध्ये मिरवत असतो अशी या आरोपीची ओळख आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की २९ वर्षीय पीडितेने बेरोजगार असून ही नोकरीच्या शोधात होती नोकरी मिळवण्यासाठी जून २०२१ ला ती एका शाळेत गेली. शाळेत काम आटोपल्यानंतर बाहेर आल्यानंतर ओळखीचा असलेला जावेद हा तिथे होता. यावेळी त्यांनी तिला वडापाव खाण्यासाठी बोलवलं. वडापाव व पिण्याचे पाणी दिल्यानंतर पीडितेला चक्कर आली. यावेळी आरोपीने तिला रिक्षा स्टँडवर सोडतो असे सांगून थेट स्वतःच्या घरी येऊन गेला. तरुणीला घरी घेऊन गेल्यानंतर तिला निर्वस्त्र करत तिच्यावरती अत्याचार केला. या दरम्यान आरोपीने व्हिडिओ शूट केला दरम्यान या व्हिडिओची धमकी दाखवत पिढी त्याला वारंवार त्रास देत होता. तरुणीला बदनामी करण्याची भीती दाखवत वारंवार घरी बोलून अत्याचार करत होता बदनामी होऊ नये या भीतीपोटी तरुणी गप्प होती मात्र सय्यद जावेद हा वारंवार घरी बोलून अत्याचार करत असल्यामुळे पिढीचा त्रस्त झाली होती. दरम्यान कंटाळलेल्या तरुणीने मंगळवार दिनांक २५ रोजी थेट जिंसी पोलीस ठाणे गाठत आरोपी विरोधात फिर्याद दिली. पीडितेला दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक भंडारी यांनी अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सोनावण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मीरा चव्हाण करीत आहेत.