पुण्यात गुलाबजामवरुन भिडले नातेवाईक आणि केटरर्स, लग्नाच्या मांडवातच तुफान हाणामारी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, April 27, 2023

पुण्यात गुलाबजामवरुन भिडले नातेवाईक आणि केटरर्स, लग्नाच्या मांडवातच तुफान हाणामारी

https://ift.tt/e3UNQ1R
म. टा. प्रतिनिधी, हडपसरः लग्नात शिल्लक राहिलेले गुलाबजाम घरी घेऊन जाण्यावरून नातेवाइक व केटरर्स व्यवस्थापक यांच्यात हाणामारी झाल्याची घटना घडली. ही घटना शेवाळेवाडी येथे मंगळवारी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जखमी व्यवस्थापक दिपांशु गुप्ता (वय २६, रा. राजयोग मंगल कार्यालय, शेवाळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवाळेवाडी येथील राजयोग मंगल कार्यालयात लोखंडे आणि कांबळे परिवारांचा विवाहसोहळा होता. केटरिंगचे काम फिर्यादींकडे होते. दीड वाजता लग्न पार पडल्यावर सर्व पाहुण्यांचे जेवण झाले. सायंकाळी सहाच्या सुमारास वरपक्षाकडील व्यक्तीने राहिलेले जेवण सोबत घेऊन जायचे असल्याचे सांगितले.त्यासाठी काही हरकत नसल्याचे गुप्ता यांनी सांगितल्यावर ती व्यक्ती नातेवाइकांसह राहिलेले जेवण डब्यात भरत होती. त्यातील एक जण गुलाबजाम डब्यात भरू लागला. मात्र, ‘हे गुलाबजाम तुमचे नाहीत. उद्याच्या लग्नाच्या जेवणासाठी तयार केलेले आहेत. ते घेऊन जाऊ नका,’ असे गुप्ता यांनी सांगितले. त्यामुळे शाब्दिक वाद वाढून तिघांनी गुप्ताला मारहाण केली; तसेच लोखंडी झारा मारून जखमी केले. यानंतर गुप्ता यांचे मालक तिथे आल्यावर आरोपी पळून गेले. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.