Petrol Rate Today: कच्चे तेल स्वस्त झाले, तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर लगेच तपासा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, April 25, 2023

Petrol Rate Today: कच्चे तेल स्वस्त झाले, तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर लगेच तपासा

https://ift.tt/WlRifDT
नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या किमतीत आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा घसरण होताना दिसत आहे. आजही कच्च्या तेलाच्या किमती घसरणीसह व्यवहार करत आहेत. या कालावधीत, ब्रेंट क्रूड तेलाची किंमत ०.११% टक्क्यांनी प्रति बॅरल $८२.६४ वर व्यवहार करत आहे, तर WTI क्रूड ऑइलच्या किंमतीत ०.०९ टक्क्यांची किंचित घट नोंदवली गेली आणि प्रति बॅरल $७८.६९ वर व्यापार करत आहे. ओपेक देशांनी घेतलेल्या निर्णयाच्या परिणामी कधीकधी क्रूडचा भाव १०० डॉलरच्या या विक्रमी पातळीच्या जवळपास पोहोचला होता.पेट्रोल आणि डिझेलचा आजचा भावकच्च्या तेलाच्या दरात चढउतार होऊनही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या वर्षभरापासून राष्ट्रीय पातळीवर इंधनाचा भाव स्थिर आहे. तसेच आज म्हणजेच मंगळवारी देखील पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. २५ एप्रिल २०२३ रोजीही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या असून सलग ३३७व्या दिवशी देशात इंधन दरात कोणताही बदल झालेला नाही.पेट्रोल-डिझेलचे दर कसे निश्चित केले जातातदररोज सकाळी ६ वाजता सरकारी तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी करतात. राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर ग्राहकांना किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट किमतीत गाडीची टाकी फुल्ल करावी लागते. दरम्यान, आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल न झाल्यामुळे मुंबईकरांना आज पुन्हा १०० रुपयेपेक्षा जास्त खर्च करून इंधन खरेदी करावे लागणार आहे. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा भाव ९४.२७ रुपये प्रति लीटर आहे.जर तुम्हाला घराबाहेर न पडता तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती चेक करायच्या असतील तर लक्षात घ्या की तेल कंपन्या तुम्हाला SMS पाठवूनही दर जाणून घेण्याची सुविधा देतात. तुम्हाला तुमच्या शहराचा RSP कोड लिहून तुमच्या तेल कंपनीला पाठवायचा आहे, त्यानंतर तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती SMS द्वारे समजतील.