SSY योजनेच्या खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी! गुंतवणूकदारांनी तातडीने ही कागदपत्रे सादर करावी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, April 18, 2023

SSY योजनेच्या खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी! गुंतवणूकदारांनी तातडीने ही कागदपत्रे सादर करावी

https://ift.tt/pf1TJLZ
मुंबई : सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणार्‍या खातेदारांना व्याजदर आणि मुदतपूर्तीची रक्कम मिळण्यासाठी केवायसी (KYC) कागदपत्रे जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. खातेदारांच्या आर्थिक देखरेखीसाठी आणि सुरक्षिततेसाठी अर्थ मंत्रालयाने सुकन्या गुंतवणूकदारांना त्यांचे खाते आधार आणि पॅनशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी मुदतही जाहीर करण्यात आली असून, मुदतीपूर्वी लिंक न केल्यास सुकन्या खाते गोठवू शकते.आधार लिंक करण्याची अंतिम मुदतअर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सुकन्या समृद्धी योजनेच्या गुंतवणूकदाराने ३१ मार्च २०२३ पूर्वी खाते उघडले असेल आणि त्याचा आधार क्रमांक खाते कार्यालयात जमा केला नसेल, तर त्याने १ एप्रिलपासून सहा महिन्यांच्या आत आधार क्रमांक संबंधित कार्यालयात जमा करावा. याशिवाय ज्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडले आहे, तिथेही आधार जमा करून लिंक केले जाऊ शकते. आधार जमा करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२३ आहे. सुकन्या खातेधारक आधारसोबत पॅन देखील जमा करू शकतात.सुकन्या खाते आधारशी लिंक नसेल तर?अर्थ मंत्रालयाच्या सूचनेनुसार, दिलेल्या मुदतीत सुकन्या समृद्धी योजना खात्याशी आधार क्रमांक लिंक न केल्यास खाते गोठवले जाईल. अशा परिस्थितीत गुंतवणूकदाराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्याजाची रक्कम सुकन्या खातेदाराच्या खात्यात जमा केली जाणार नाही. त्याच वेळी सुकन्या खातेदार देखील हप्ता जमा करू शकणार नाहीत. तर सुकन्या समृद्धी योजनेच्या परिपक्वतेवर खातेदाराच्या बँक खात्यात रक्कम हस्तांतरित केली जाणार नाही.योजना कायकेंद्र सरकारने २०१५ मध्ये बेटी बचाओ-बेटी पढाओ मिशन अंतर्गत सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. या योजनेत मुलीच्या नावाने खाते उघडून १५ वर्षांपर्यंत रक्कम जमा करता येते. सुकन्या योजनेसाठी, १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचे खाते उघडता येते. पालक त्यांच्या मुलीसाठी जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या खाते उघडू शकतात.सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदरकेंद्र सरकारने एप्रिल-जून तिमाहीसाठी छोट्या बचत योजना आणि पोस्ट ऑफिस बचत योजनांवरील व्याजदरांमध्ये सुधारणा केली आहे. यानुसार सुकन्या सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8 टक्के झाला आहे. आधी हा दर ७.६% होता. अर्थ मंत्रालयाने ३१ मार्च २०२३ रोजी एक परिपत्रक जारी करून सर्व सुकन्या गुंतवणूकदारांसह लहान बचत योजनांची खाती आधारशी जोडणे अनिवार्य केले आहे.