
विरार : घर दाखवण्याच्या बहाण्याने करून त्यानंतर पुन्हा महिलेला ब्लॅकमेल करून नराधम आरोपीने पुन्हा पीडीत महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नालासोपारा परिसरात घडली आहे. याप्रकरणी महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला आचोळे पोलिसांनी अटक केली आहे.आरोपीन पीडित महिलेच्या शेजारीच राहत असून त्याने प्रथम पीडित महिलेची मैत्री केली. त्यानंतर तिला त्याचे घर दाखवण्याच्या बहाण्याने आपल्या घरी नेले. घरी तिच्या एकटेपणाचा फायदा घेऊन तिच्यावर आरोपीने अत्याचार केला. यावेळी नराधम आरोपीने त्याचे अश्लील फोटो काढले. त्यानंतर अश्लील फोटोबाबत सतत धमकी देत अत्याचार सुरूच ठेवले. याबाबत कोणासमोर तोंड उघडल्यास, कोणाशी वाच्यता केल्यास तुझ्या पतीलाही मारून टाकेन अशी धमकीही पिडीत महिलेला दिली. नालासोपारा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. सततच्या होणारा अत्याचार असह्य झाल्याने पीडित महिलेने आचोळे पोलीस ठाणे गाठले आणि आपली आपबीती पोलिसांना सांगितली. त्यानंतर नराधम आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर याप्रकरणी अचोळे पोलीस ठाण्यात भादविस कलम ३७६, ३७६ (२)(एन), ५०४, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला केली अटकमहिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला आचोळे पोलिसांनी अटक केली असून आकाश सांकपाळ असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.