बसटफरनड सवपनत यत अन बलवत; वरषय तरणन उचलल टकच पऊल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, June 16, 2023

बसटफरनड सवपनत यत अन बलवत; वरषय तरणन उचलल टकच पऊल

https://ift.tt/R1gAMrL
नागपूर : बेस्टफ्रेन्डने तीन महिन्यांपूर्वी आत्महत्या केल्यापासून तणावग्रस्त असलेल्या तरुणीने पाण्याच्या टाकीत उडी घेत आत्महत्या केली. प्रियंका नंदराव सराटे (वय २२, रा. चिराग आईस फ्रॅक्ट्रीजवळ, वाठोडा) असे या तरुणीचं नाव आहे. प्रियंकाची मृत बेस्टफ्रेन्ड तिच्या स्वप्नात येत असे आणि यामुळे ती तणावग्रस्त असल्याचे कळते. ही घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी संध्याकाळी ६च्या सुमारास समोर आली. प्रियंकाचे वडील आईस फ्रॅक्ट्रीत काम करतात. तीसुद्धा एका दुकानात काम करत होती. तेथे तिची एका तरुणीशी ओळख झाली. त्यांच्यात मैत्री झाली. त्या बेस्टफ्रेन्ड असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. मात्र, तीन महिन्यांपूर्वी तिच्या मैत्रिणीने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेचा खोलवर परिणाम प्रियंकाच्या मनावर झाला. "आपली मैत्रीण आपल्या स्वप्नात येते आणि आपल्याला बोलावते", असं ती सांगत असे. गेल्या काही दिवसांपासून ती फार तणावात असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलं आहे. १३ जून रोजी ती बेपत्ता झाल्यानं तिच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली. मात्र, १४ जून रोजी परिसरातील पाण्याच्या टाकीत तिचा मृतदेह सापडला. तूर्त पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे. यात अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोशीवाडी परिसरातील कुणाल गुलाब महातो (वय ३२) याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांची पत्नी मुलाबाळांसह माहेरी निघून गेली होती. यामुळे ते अस्वस्थ होते. या कारणामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिध्दार्थनगर येथील रहिवासी राकेश भाऊराव ढोके (वय ५१) यांनी अज्ञात कारणावरून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. याखेरीज जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवनगरी परिसरातील रहिवासी उदल सेवकराम टेंभरे (वय ४०) यांनीसुद्धा अज्ञात कारणावरून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित पोलिसांनी तूर्त आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.