बरख घलन मय रगणलयत; पलसन सशय यतच चकश तपसत धककदयक सतय समर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, June 15, 2023

बरख घलन मय रगणलयत; पलसन सशय यतच चकश तपसत धककदयक सतय समर

https://ift.tt/DOZPonF
नागपूर : शहरातील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयातून (मेयो) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान रुग्णालयात एक तरुण बुरखा घालून हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. मात्र, त्याच्या संशयास्पद हालचाली पाहून मेयोच्या सर्जिकल कॉम्प्लेक्सच्या मुख्य गेटवर कर्तव्यावर तैनात असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या (एमएसएफ) जवानाने त्याला पकडून चौकशी केली. सुरुवातीला बुरख्यात ती महिला डॉक्टर असल्याचे सर्वांना वाटले, पण तपासात धक्कादायक सत्य बाहेर आले. जावेद शेख असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो गेल्या १५ दिवसांपासून याच वेशात फिरत होता. बुरख्यात तरुण आढळल्याने रुग्णालयात खळबळ उडाली आहे. चौकशीनंतर आरोपीला तहसील पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मेयो हॉस्पिटलच्या परिसरामध्ये तैनात असलेल्या संतोषी यूईके या महिला सुरक्षा कर्मचाऱ्याला एक बुरखाधारी व्यक्ती संशयास्पद अवस्थेत फिरताना आढळून आली. यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. कपडे बघून आधी वाटलं ती महिला डॉक्टर आहे. हॉस्पिटलचे ओळखपत्र मागितले असता ती व्यक्ती प्रतिसाद देत नसल्याचे पाहून महिला सुरक्षा रक्षकाला बोलावण्यात आले. आपले म्हणणे मांडत असताना त्याने महिलेचा आवाज काढण्याचा प्रयत्न केला त्यामुळे संशय आणखीच वाढला.त्या व्यक्तीला बुरखा काढण्यास सांगितल्यावर बुरख्यातून एक दाढीवाला तरुण बाहेर आला. चौकशीत असे आढळून आले की, या तरुणाला पुरुषांचे आकर्षण आहे. याच कारणावरून तो रुग्णालयाच्या आवारात महिलेच्या रुपात फिरत होता. हा तरुण गेली अनेक दिवस याच वेशात महाविद्यालयाच्या परिसरात फिरत होता. त्याची झडती घेतली असता, ज्या वस्तू महिला वापरतात त्याच्याकडे त्या वस्तू आढळून आल्या. त्यानंतर लगेचच त्याची माहिती तहसील पोलिसांना देण्यात आली. पोलिसांकडून तरुणाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.