अरे देवा! एकाच घरात २४ खतरनाक साप निघाले, पाहताच आरडाओरड अन् मग... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, July 16, 2023

अरे देवा! एकाच घरात २४ खतरनाक साप निघाले, पाहताच आरडाओरड अन् मग...

https://ift.tt/5jQDEcY
पाटणा: नेहमी घडणाऱ्या विचित्र घटनांसाठी प्रसिद्ध असलेलं बगाहा हे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. येथे कधी माणसाला मगर जिवंत गिळते, तर कधी दुर्मिळ प्राणी-पक्षी दिसतात. पण, यावेळी या परिसरात जे घडलं ते पाहून तुम्हाला धक्काच बसेल. बगाहाच्या मधुबनी पंचायतीच्या वॉर्ड-५ मध्ये असलेल्या एका घरातून तब्बल २४ विषारी सापांची सुटका करण्यात आली आहे. हे प्रकरण स्थानिक रहिवासी मदन चौधरी यांच्या घरचे असल्याचं संबंधित आहे, जिथे घराच्या जिन्याखाली सापांनी तळ ठोकला होता.सापांसह अंडीही सापडलीआश्‍चर्यकारक बाब म्हणजे या २४ सापांसह सुमारे ५० ते ६० अंडीही बाहेर काढण्यात आली. घराच्या जिन्याखाली ड्रेसिंग टेबल ठेवण्यात आले होते, ज्याच्या खाली सापांनी आश्रय घेतला होता. शुक्रवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या सापांचं बचावकार्य हे रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. खेळताना मुलांना दिसला सापघरात लहान मुलं खेळत होती, तेव्हा त्यांच्या जवळून एक साप गेला. सापाला पाहताच मुलं घाबरुन आरडाओरड करु लागली, जोरजोराने रडू लागली. मुलांना आवाज ऐकून आसपासची लोक जमा झाली. त्यानंतर या सापांना बाहेर काढण्यास सुरुवात करण्यात आली.ड्रेसिंग टेबलच्या खाली सापस्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ड्रेसिंग टेबल बाजुला केले तेव्हा त्यातून तीन ते चार कोब्रा बाहेर आले. यानंतर लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर स्थानिक लोकांनी सर्पमित्रांना बोलावलं. माहिती मिळताच सर्पमित्र घटनास्थळी पोहोचले आणि या सांपाची सुटका सुरू केली. बचावकार्य सुरू होताच तेथे उपस्थित असलेले लोक सुन्न झाले. या घरातून एकापाठोपाठ एक २४ साप निघाले. इतकंच नाही तर त्या जागेहून ५० ते ६० अंडीही सापडली आहेत.