अगोदर उपोषण सोडा! मुख्यमंत्र्यांची दत्ता पाटील हडसनिकरांना विनंती, फोनद्वारे साधला संवाद - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, July 19, 2023

अगोदर उपोषण सोडा! मुख्यमंत्र्यांची दत्ता पाटील हडसनिकरांना विनंती, फोनद्वारे साधला संवाद

https://ift.tt/JBaMAEG
नांदेड: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १५ दिवसांपासून आमरण उपोषण करणाऱ्या यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संवाद साधला. खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या फोनवरून व्हिडिओ कॉलद्वारे मुख्यमंत्र्यांचे बोलणे करून दिले. लागू करण्याच्या मागणीसाठी हदगाव तालुक्यातील हडसनी येथील दत्ता पाटील हडसनिकर यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. हडसणी गावातील हनुमान मंदिरावर दत्ता पाटील यांणी उपोषण सुरु केले होते. दत्ता पाटील यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरी दत्ता पाटीलांनी रुग्णालयात उपोषण सुरू ठेवले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. दरम्यान मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या फोनवरून दत्ता पाटील यांच्याशी व्हिडिओ कॉल द्वारे संवाद साधला. मराठा आरक्षण ही सरकारची जबाबदारी असून याबाबत मुंबईला आल्यावर सविस्तर माहिती देतो. अगोदर उपोषण सोड, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी उपोषण कार्यकर्त्याला केली. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हदगाव तालुक्यातील दत्ता हडसनिकर यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा मुद्दा आज मंगळवारी अधिवेशात गाजला. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपोषणाबाबत आवाज उठवत मराठा आरक्षणाबाबत सध्याची परिस्थिती काय आहे याची सरकारने माहिती द्यावी, अशी मागणी केली. शासन काय करत आहे, याबाबत उपोषणर्ता दत्ता पाटील यांना माहिती देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती सरकारतर्फे करण्यात यावी, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ सरकारतर्फे मराठा आरक्षणाबाबत माहिती देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली जाईल, असे उत्तर दिले.