EPF खातेधारकांसाठी कामाची बातमी; पीएफ खात्यात तुमचे तपशील अपडेट करण्यासाठी नवी प्रक्रिया पाहा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 31, 2023

EPF खातेधारकांसाठी कामाची बातमी; पीएफ खात्यात तुमचे तपशील अपडेट करण्यासाठी नवी प्रक्रिया पाहा

https://ift.tt/np8SIct
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी खात्यात कर्मचाऱ्याकडून तसेच त्याच्या रोजगारदात्या कंपनीकडून काही योगदान नियमित टाकले जाते. यामुळे या कर्मचाऱ्याचा कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी अर्थात ईपीएफ साठत जातो, ज्याचा उपयोग त्याला निवृत्तीपश्चात होतो. या ईपीएफ खात्यांचे संचालन कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) करते. या ईपीएफ खात्यांतील माहिती अद्ययावत करण्यासाठी ईपीएफओने नवी प्रक्रिया आणली आहे. याद्वारे या अद्ययावतीकरण प्रक्रियेचे प्रमाणिकरण करण्यात आल्याचा दावा ईपीएफओने केला आहे.नवी प्रक्रिया जाहीर करताना ईपीएफओने स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) प्रसिद्ध केले आहे. या, मध्ये ईपीएफओच्या सदस्य कर्मचाऱ्याला त्याच्या ईपीएफ खात्यासाठी अत्यावश्यक असलेल्या तपशीलात बदल करण्याची मुभा देण्यात आली आहे. विशेषतः नावाचे स्पेलिंग, वैवाहिक स्थिती, आधार क्रमांकासंदर्भातील माहिती असे बदल करण्याची अनुमती देण्यात आली आहे. यापैकी वैवाहिक स्थिती सोडल्यास बाकीते सर्व बदल फक्त एकदाच करता येणार आहेत. वैवाहिक स्थितीबाबत माहितीत दोनदा बदल करण्याची मुभा आहे.नावात बदल:दोनपेक्षा अधिक अक्षेर बदलली असल्यास किंवा दोनपेक्षा अधिक अक्षरे नावातून कमी करण्यात आली असल्यास किंवा नावातील अक्षरांचा विस्तार करायचा असल्यास बदल करता येणार आहे.जन्मदिनांक: तीन वर्षांहून अधिक काळ केलेला बदल कायम राहिल्यास तसा बदल ईपीएफ खात्यातील जन्मदिनांकात करता येईल.वडीलांचे नाव:वडीलांच्या नावात दोनपेक्षा अधिक अक्षरांमध्ये बदल झाल्यास किंवा उच्चारानुसार बदल करण्यात आल्यास, वडीलांचे नाव प्रथमच खातेदाराच्या नावात समाविष्ट करायचे झाल्यास, नावाचा विस्तार करायचा झाल्यास तसे करता येणार आहे.वैवाहिक स्थिती ईपीएफ सदस्याच्या मृत्यूनंतर हा बदल करता येईल.रुजू झाल्याचा दिनांक सदस्याच्या मृत्यूनंतर यात बदल करता येईलखाते सोडल्याचा दिनांक सदस्याच्या मृत्यूनंतर यात बदल करता येईलआधार आधार कार्डासाठी दिलेला तपशील बदलल्यास तसे बदल ईपीएफ खात्यासाठी दिलेल्या माहितीत करता येतील.एसओपीनुसार ईपीएफ खातेदाराने या ११ गोष्टी पहाव्यात -- नाव (योग्य स्पेलिंगसह)- लिंग (स्त्री, पुरुष, अन्य)- जन्मदिनांक- वडीलांचे नाव- नाते- वैवाहिक स्थिती- रुजू झाल्याचा दिनांक- खाते सोडण्याचे कारण- कंपनी सोडल्याचा दिनांक- राष्ट्रीयत्व- आधार क्रमांक