किराणा दुकानात गप्पा मारत उभे होते; तीन टोळके आले, क्षुल्लक कारणावरून वाद घातला, नंतर जे घडलं ते पाहून... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, September 17, 2023

किराणा दुकानात गप्पा मारत उभे होते; तीन टोळके आले, क्षुल्लक कारणावरून वाद घातला, नंतर जे घडलं ते पाहून...

https://ift.tt/5NC38MS
नाशिक: विविध कारणातून भांडण होत असतात. कधी कधी हे भांडण टोकालाही जाते. घराजवळील गल्लीतील वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचतो. मात्र नाशिकमध्ये एका शुल्लक कारणातून टोळक्यानं एका ४५ वर्षीय व्यक्तीस मारहाण करत जखमी केले आहे. याप्रकरणी नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात चार जणांनी विरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. 'एवढे जोरात का बोलतो' अशी कुरापत काढून नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या बोरगड भागात टोळक्याने ४५ वर्षीय व्यक्तीला मारहाण केली आहे. या घटनेत दगड फेकून मारण्यात आल्याने ४५ वर्षीय व्यक्ती जखमी झाला आहे. गोपाळ जाधव, विचू उर्फ चोर, शुभम बनकर आणि तुषार जाधव अशी मारहाण करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. याबाबत सुनिल जगन्नाथ बनसोडे (४५ रा.ओमकारनगर गणपती मंदिरामागे लामखेडे मळा) यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनसोडे शुक्रवारी (दि.१५) बोरगड भागात गेले होते. सायंकाळच्या सुमारास ए.टी.पवार आश्रम शाळेजवळील किराणा दुकानात ते गप्पा मारत उभे असताना ही घटना घडली. दरम्यान, संशयितांनी एवढे जोरात का बोलतो अशी कुरापत काढली आणि बनसोडे यांना जोर जोरात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी ते समजून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना टोळक्याने त्यांना दमदाटी करत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. संतप्त झालेल्या या टोक्यातील एकाने त्यांना दगड फेकून मारल्याने ते जखमी झाले. किराणा दुकानात गप्पा मारत असलेल्या बनसोडे यांना टोळक्यांने कुरापत काढून शिवीगाळ करत मारहाण केली. दगडही मारत जखमी केले. त्यानंतर हे प्रकरण थेट पोलिसातच गेले. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार फुगे करीत आहेत.