
नवी दिल्ली : सध्याच्या घडीला भारताचे आजी-माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा एक व्हिडिओ जगभरात चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये या दोघांसह भारतीय खेळाडू चांगलेच थिरकले आहेत. हा व्हिडिओ आहे तो टीम इंडियाच्या 'तीन का ड्रीम'चा. टीम इंडियाचे हे 'तीन का ड्रीम' आहे तरी काय, जाणून घ्या...भारतीय संघाने काही दिवसांपूर्वी आशिया चषकावर आपले नाव कोरले. त्यामुळे भारतीय संघ सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्मात आहे. आशिया कपनंतर आता भारताचा संघ ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. पण यावेळी सर्वांचे लक्ष लागलेले आहे ते वनडे वर्ल्ड कपवर. कारण हा वर्ल्ड कप भारतामध्ये ५ ऑक्टोबरपासून होणार आहे. पहिल्यांदाच फक्त भारतामध्ये वर्ल्ड कपच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. भारताेन १९८३ साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिला वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नोतृत्वाखाली भारातने वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळी वर्ल्ड कप भारत, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांत खेळवला गेला होता. आता भारताला तिसऱ्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. सर्व भारतीय तिसऱ्या वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न पाहत आहेत. वर्ल्ड कपपूर्वी आता भारतीय संघाचे एक खास गाणं समोर आले आहे. या गाण्यात 'तीन का ड्रीम' असे म्हटले गेले आहे, याचा अर्थ तिसऱ्या वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न.. असा आहे. त्यामुळे आता तिसऱ्यांदा भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकणार का, याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे.रोहित आणि कोहलीसह भारतीय खेळाडू थिरकले...या खास गाण्यावर भारतीय खेळाडू थिरकल्याचे पाहायला मिळाले आहे. या गाण्यामध्ये रोहित-कोहली यांच्यासह हार्दिर पंड्या, रवींद्र जडेजा, शुभमन गिल हे भारतीय खेळाडू आहेत. या गाण्यामध्ये भारतीय खेळाडूंचे काय ध्येय आहे आणि त्यासाठी ते नेमकं काय करत आहे, हे दाखवण्यात आले आहे. या गाण्यात काही युवा चाहत्यांचाही समावेश करण्यात आला आहे. युवा चाहते यावेळी या गाण्यावर चांगलेच थिरकले आहेत. हे गाणं सध्याच्या घडीला चांगलेच व्हायरल झाले आहे आणि 'तीन का ड्रीम' हे जवळपास प्रत्येकाच्या ओठांवर आले आहे. त्यामुळे आता वर्ल्ड कपमध्येही हे गाणे चांगलेच गाजेल, असे म्हटले जात आहे.भारतीय चाहत्यांसाठी हे खास गाणे तयार करण्यात आले आहे आणि त्याचा व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे.