पुण्यात बिबट्याचं ३ महिन्यांचं पिल्लू विहिरीत पडलं; नंतर जे घडलं ते पाहून तुमचंही मन भरून येईल! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 22, 2023

पुण्यात बिबट्याचं ३ महिन्यांचं पिल्लू विहिरीत पडलं; नंतर जे घडलं ते पाहून तुमचंही मन भरून येईल!

https://ift.tt/Hl1zX50
पुणे : वनविभाग आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टने राबविलेल्या बचाव मोहिमेत पुण्याजवळील एका गावात विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या तीन महिन्यांच्या पिल्लाची अवघ्या ४ तासांत सुटका करण्यात आली आणि त्याच दिवशी पिल्लाला त्याच्या आईकडे सुखरूप पोहोचविण्यास बचाव पथकाला यश आले. वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अशुतोष शेंडगे यांच्याकडून माहिती मिळताच रेस्क्यूचे पथक तत्काळ कारवाई करण्यासाठी गेले होते. वनविभागाचे अनिल राठोड आणि रेस्क्यू पथकाने बछड्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी विहिरीमध्ये पिंजरा सोडला. पिंजरा विहिरीत सोडल्यावर काही वेळातच पिल्लू पिंजरात जाऊन बसले. त्याला वर काढल्यावर पशुवैद्यकीय तज्ञ डॉक्टर पूर्वा यांनी बछड्याची तपासणी केली. पिल्लू सुदृढ असल्याने त्याला पुन्हा निसर्गात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या भागात पिल्लू सापडले तेथील एका शेतामध्ये त्याला संध्याकाळी पिंजऱ्यात ठेवण्यात आले. रिमोट कॅमेऱ्याच्या माध्यमातून बछड्याचे आणि पिंजऱ्याच्या दरवाजाचे बारकाईने निरीक्षण सुरू होते. रेस्क्यू पथक पिंजऱ्यापासून काही अंतर दूर उभे होते. संध्याकाळनंतर बछड्याची आई पिलाच्या शोधात पिंजऱ्याजवळ आली. त्यावेळी बचाव पथकाने पिंजरा उघडला आणि पिल्लू आईकडे गेले. दोघेही समोरील शेतात काही वेळातच निघून गेले.