काय आहे 'UDGAM' पोर्टल; बँकांमधील बेवारस पडून राहिलेली रक्कम शोधणे आता सोपे, पाहा संपूर्ण प्रक्रिया - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, September 18, 2023

काय आहे 'UDGAM' पोर्टल; बँकांमधील बेवारस पडून राहिलेली रक्कम शोधणे आता सोपे, पाहा संपूर्ण प्रक्रिया

https://ift.tt/QXZSkYy
देशातील सर्वच बँकांतून दावा न केलेले कोट्यवधी रुपये सध्या पडून आहेत. यापैकी काही रकमेसाठी दावेदार पुढे येतही आहेत. मात्र हे दावेदार ती रक्कम ज्यांच्या खात्यात आहे त्यांचे खरे वारसदार आहेत की नाही, हे पाहणे संबंधित बँकेसाठी मोठीच डोकेदुखी होऊन बसले आहे. तोतया दावेदारांच्या हातात एखाद्या मृत खातेदाराची किंवा ठेवीदाराची लाखो रुपयांची रक्कम जाऊ नये यासाठी यावर उपाय करण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रत्येक बँक करते. तरीही विनादावा रक्कम चुकीच्या व्यक्तीकडे जाण्याचा धोका उरतोच हा धोका बऱ्यापैकी कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने विशेष पोर्टल १७ ऑगस्ट रोजी सुरू केलं. याचं नाव आहे - उद्गम (UDGAM म्हणजे अनक्लेम्ड डिपॉझिट्स - देटवे टू ॲक्सेस इन्फर्मेशन). आपल्या प्रियजनांची विनादावा रक्कम नेमकी कोणत्या बँकेत किंवा बँकांमध्ये आहे हे खऱ्या वारसदाराला ऑनलाइन शोधता यावं या उद्गम पोर्टलचा उद्देश आहे.या पोर्टलची सुरूवात केली जाईल अशी घोषणा रिझर्व्ह बँकेने ६ एप्रिल २०२३ रोजी सादर केलेल्या नव्या २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पतधोरण बैठकीदरम्यान केली होती.विनादावा ठेवी म्हणजे काय?- रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, बँकेच्या बचत खात्यात किंवा चालू खात्यात १० वर्षांपेक्षा अधिक काळ कोणताही व्यवहार (पैसे भरणे, पैसे काढणे, दुसऱ्याला पैशाची अदायगी करणे इ.) झाला नसेल अशा खात्यांतली शिल्लक रक्कम ही विनादावा ठेव असते.- त्याचप्रमाणे, एखाद्या मुदतठेवीची मुदतपूर्ती झाल्यानंतर १० वर्षांच्या आता कोणीही त्याची व्याजासह मिळणारी रक्कम घेण्यास पुढे आला नाही तर अशी ठेवही विनादावा ठेव होते.विनादावा ठेवींची स्थिती- बँक खाते अकार्यरत झाले तर ती विनादावा ठेव होते.- अकार्यरत बँक खात्यातील रक्कम रिझर्व्ह बँकेच्या डिप़ॉझिटर्स एज्युकेशन अँड अवेअरनेस फंडात जमा केली जाते.- सध्या म्हणजे फेब्रुवारी २०२३पर्यंत सरकारी बँकांत ३५ हजार कोटी रुपये विनादावा आहेत.कार्यरत बँक खात्याचा अकार्यरत होण्याकडे प्रवास- दोन वर्षांपेक्षा अधिक काळ बचत आणि चालू खात्यात कोणताच व्यवहार न झाल्यास ते प्रथम अकार्यरत- मुदतपूर्तीनंतर ठेवीची रक्कम दोन वर्षांपर्यंत कुणी घ्यायला न आल्यास ती ठेव अकार्यरत होते.- १० वर्षे वाट पाहून मग बँक अशी खाती व ठेवी रिझर्व्ह बँकेच्या डिप़ॉझिटर्स एज्युकेशन अँड अवेअरनेस फंडात जमा करते.- या खात्यांतील रकमेवर ११ मे २०११पासून किमान ३ टक्के वार्षिक सरळव्याज मिळते.उद्गमसाठी यांचे योगदान- रिझर्व्ह बँक इन्फर्मेशन टेक्नॉल़ॉजी प्रा. लिमिटेड (आरईबीआयटी)- इंडियन फायनान्शियल टेक्नॉलॉजी अँड अलाइड सर्व्हिसेस (इफ्टास)- भारतीय स्टेट बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सीटी बँक, डीबीएस बँक, धनलक्ष्मी बँक, पंजाब नॅशनल बँक, साऊथ इंडियन बँक या सात बँकाउद्गम पोर्टलचा वापर कसा करावा?उद्गम पोर्टलवर https://ift.tt/6njygM4 या लिंकवर जाऊन नावनोंदणी व मोबाइल क्रमांक नोंदणी केल्यावर तुम्हाला तुमच्या विनादावा ठेवी शोधण्याची प्रक्रिया सुरू करता येते. एकदा तुम्हाला अशा रकमा किंवा अशी खाती मिळाली की मग त्यातल्या रकमेचा अधिकृत वारस या नात्याने दावाही करता येतो. मात्र यासाठी या लिंकवर जाऊन लॉगइन करावे लागते.- विनादावा रक्कम शोधू पाहणाऱ्या व्यक्तीला स्वतःची नोंदणी या पोर्टलवर करावी लागते.- स्वतःचे नाव व संपर्काचा तपशील भरावा लागतो.- या पोर्टलचा वापर करणाऱ्याला ज्याचे विनादावा खाते शोधायचे आहे त्याचा पॅन क्रमांक, मतदार ओखळपत्राचा तपशील, वाहनचालन परवान्याचा तपशील आणि पासपोर्टचा तपशील यापैकी उपलब्ध तपशील भरावा लागतो.- सध्या एकूण २३ बँकांनी ही सुविधा देणे सुरू केले आहे.- १५ ऑक्टोबरपर्यंत टप्प्याटप्प्याने उद्गमची ही सेवा देशातील सर्व बँकांतून सुरू केली जाणार आहे.