रोहित सामना सुरु असतानाच सिराजवर का भडकला, पाहा व्हायरल व्हिडिओ... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 12, 2023

रोहित सामना सुरु असतानाच सिराजवर का भडकला, पाहा व्हायरल व्हिडिओ...

https://ift.tt/ld6YHPk
नवी दिल्ली : सध्याच्या घडीला रोहित शर्माचे नाव हे जोरदार गाजत आहे. कारण त्याने वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले. पण या सामन्यात एक गोष्ट अशी घडली जी कोणालाही माहिती नाही. या सामन्यात रोहित शर्मा हा मोहम्मद सिराजवर चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. या गोष्टीचा व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे.भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तान संघाने दमदार सुरुवात केली. यावेळी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजक़डून चांगली कामगिरी झाली नाही. तो सुरुवातीपासूनच गोलंदाजीत संघर्ष करताना दिसला. यावेळी सिराजने आपल्या ९ षटकात एकही विकेट न घेता ७६ धावा दिल्या, हा सामान सुरु असताना अफगाणिस्तानचा फलंदाज हशमतुल्ला शाहिदीला पाठीमागे दुखापत झाली आणि त्यामुळे सामना काही काळ थांबवण्यात आला. यादरम्यान टीम इंडियाचे सर्व खेळाडू आपापसात बोलताना दिसले. यादरम्यान रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराजही बोलताना दिसले. यावेळी रोहित सिराजवर भडकल्याचे पाहायला मिळाले. या गोष्टीचा व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे.या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा मोहम्मद सिराजसोबत बोलताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा हा वाईट गोलंदाजीमुळे सिराजला फटकावताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड कपमधील पहिल्या सामन्यातही सिराजची कामगिरी चांगली झाली नव्हती. सिराजला या सामन्यात अखेरची विकेट मिळाली होती. या सामन्यात सिराज हा रोहितला काही तरी समजावत असल्याचे पाहायला मिळाले. पण रोहित सिराजचे काहीही ऐकत नसल्याचे पाहायला मिळाला. शेवटी रोहित हा सिराजवर रागावल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कारण रोहित शर्मा हा शांत खेळाडू आहे, तो जास्त भडकत नाही. पण या सामन्यात मात्र तो सिराजवर भडकल्याचे पाहायला मिळाले.रोहित शर्माचा हा व्हिडिओ सध्याच्या घडीला सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या कामगिरीनंतर सिराजला पुढच्या सामन्यात संधी मिळेल, असे सध्याच्या घडीला तरी दिसत नाही.