बक्सर: बिहारमधील बक्सर येथून मोठी बातमी येत आहे. दिल्लीहून कामाख्याला जाणाऱ्या नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसला अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनच्या ५ बोगी रुळावरुन घसरल्या आहेत. डीडीयू पाटणा रेल्वे विभागाच्या रघुनाथपूर स्टेशनवर ही घटना घडली. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ही ट्रेन दिल्लीहून पाटण्याच्या दिशेने जात असल्याचे सांगण्यात येत आहे.ही ट्रेन बक्सर जंक्शनवरून पाटण्याकडे रवाना झाली होती. त्यानंतर ही गाडी रघुनाथपूर रेल्वे स्थानकाजवळ रुळावरून घसरली. त्यानंतर इतर गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. ही ट्रेन बक्सर ते आरा आणि नंतर पाटणा येथे थांबते. रघुनाथपूर रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा नव्हता. या घटनेची कारणं अद्याप समजू शकलेली नाहीत. रेल्वे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.हेल्पलाइन क्रमांक जाहीरदानापूर विभागातील रघुनाथपूर स्थानकाजवळ रात्री ९ वाजून ३५ मिनिटांनी कामाख्याहून जाणाऱ्या ट्रेन क्रमांक १२५०६ नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले. त्यासाठी हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत.PNBE - 9771449971DNR - 8905697493ARA - 8306182542COML CNL - 7759070004बक्सर लोकसभा मतदारसंघांतर्गत रघुनाथपूर रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघाताबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ही घटना दुःखद असल्याचे सांगून केंद्रीय मंत्री म्हणाले की, मदतकार्य सुरू करण्यात आले आहे, असंही त्यांनी सांगितलं. तर, दुर्घटनेनंतर स्थानिक लोकही मदतीला आले आहेत.