पुण्यातील 'लाईन बॉय' विजय ढुमे हत्या प्रकरणाचा उलगडा, माजी पोलीस अधिकाऱ्याच्या लेकाला संपवण्यामागे मोठं कारण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 2, 2023

पुण्यातील 'लाईन बॉय' विजय ढुमे हत्या प्रकरणाचा उलगडा, माजी पोलीस अधिकाऱ्याच्या लेकाला संपवण्यामागे मोठं कारण

https://ift.tt/94vZzjt
पुणे : पुण्यातील सिंहगड रोड परिसरात 'लाईन बॉय' म्हणून ओळख असलेल्या विजय ढुमे याचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. ढुमेच्या हत्याकांडामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. मात्र सिंहगड पोलिसांनी अवघ्या काही तासात या खुनातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या. प्रेम संबंधातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.या प्रकरणी पोलिसांनी संदीप तुपे, सागर तूप सुंदर, प्रथमेश खंदारे, एक अल्पवयीन मुलगा आणि विजयची प्रेयसी यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सूत्रं हलवत या घटनेचा वेगवान तपास केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार २९ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास सिंहगड रोड परिसरातील क्वालिटी पार्किंगमध्ये विजय ढुमे हा बाहेर जात असताना काही हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. लोखंडी फावडे आणि लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्याचा खून केला.विजय ढुमे हा माजी पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा होता. तसेच त्याचे राजकीय व्यक्तींशी देखील चांगले संबंध होते. मात्र त्याचाच खून झाल्याने एकच खळबळ उडाली होती.पोलिसांनी या घटनेचा तपास करताना सिंहगड रोड परिसरातील जवळपास ६० ते ७० सीसीटीव्ही फूटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणनुसार त्यांनी तपास केला असता विजयचे जुने प्रेम प्रकरण पुढे आले. पोलिसांनी तातडीने त्या महिलेला ताब्यात घेतले.तिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने आणि तिचा नवीन प्रियकर संदीप तुपे आणि त्याच्या साथीदारांनी मिळून हा खून केल्याचे समोर आले. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले आहे. हा तपास तातडीने लावल्याने पोलिस प्रशासनाचे कौतुक करण्यात येत आहे.