'न्यूजक्लिक' वेबपोर्टलचे संस्थापक अटकेत, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; काय आहे प्रकरण? - Times of Maharashtra

Wednesday, October 4, 2023

demo-image

'न्यूजक्लिक' वेबपोर्टलचे संस्थापक अटकेत, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?

https://ift.tt/Hlmc61a
photo-104144057
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : आर्थिक निधी मिळवून चीनच्या धोरणांचा प्रचार करण्याचा आरोप असलेल्या ‘न्यूजक्लिक’ या ‘न्यूज पोर्टल’वर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी छापे टाकले. कंपनीची कार्यालये; तसेच पत्रकारांची निवासस्थाने अशा ३० ठिकाणी पोलिसांनी हे छापे टाकले व ‘न्यूजक्लिक’चे दिल्लीतील कार्यालय ‘सील’ केले. चौकशीनंतर कंपनीचे संस्थापक व मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ यांना परदेशी वित्तपुरवठाप्रकरणी अटक करण्यात आली; तसेच कंपनीचे अधिकारी अमित चक्रवर्ती यांनाही अटक करण्यात आली.दिल्ली पोलिसांच्या पथकांनी सकाळी साडेसहापासून सव्वाआठपर्यंत दिल्ली, नोएडा, गाझियाबाद भागातील ‘न्यूजक्लिक’च्या पत्रकारांची घरे गाठून एकाच वेळी छापे टाकण्यास सुरुवात केली. दिल्ली पोलिसांच्या पथकांकडून ‘न्यूजक्लिक’साठी काम करणाऱ्या नऊ पत्रकारांच्या घरांवर छापे टाकले. छाप्यादरम्यान पोलिसांच्या विशेष कक्षाने मोबाइल, लॅपटॉप, कम्प्युटरसह अनेक इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त केले व बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. मंगळवारी ‘पोर्टल’चे संस्थापक व मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ यांना विशेष पथकाने ताब्यात घेऊन दक्षिण दिल्लीतील पोलिस कार्यालयात चौकशीसाठी नेले. तेथे फोरेन्सिक तज्ज्ञ उपस्थित होते. यासोबतच पोलिसांनी पत्रकार उर्मिलेश, अभिसार शर्मा, अनिंद्यो चक्रवर्ती, भाषा सिंह, व्यंगचित्रकार संजय राजौरा व इतिहासकार सोहेल हाश्मी यांचीही चौकशी केली. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.पोलिस पथक घरी धडकताच अभिसार शर्मा यांनी ‘एक्स’वरून ‘माझा लॅपटॉप आणि फोन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे,’ अशी माहिती दिली. भाषा सिंह यांनी, ‘या फोनवरून हे माझे शेवटचे ट्विट आहे. दिल्ली पोलिसांनी माझा फोन जप्त केला आहे,’ असे ट्वीट केले. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) यापूर्वी ‘न्यूजक्लिक’च्या भारतातील कार्यालयाविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून कंपनीच्या काही मालमत्ताही जप्त केल्या होत्या. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने करचोरी, परदेशी मदतीबाबतचा गुन्हा नोंदवला. तेव्हापासूनच ‘न्यूजक्लिक’ आणि त्याच्या निधीच्या स्रोतांची चौकशी सुरू आहे. ईडीचा खटलाही याच मुद्द्यावर आधारित होता. दिल्ली उच्च न्यायालयाने ‘न्यूजक्लिक’च्य़ा प्रवर्तकांना अटकेपासून दिलासा दिला होता आणि तेव्हापासून या प्रकरणी न्यायालयातही सुनावणी सुरू आहे.केंद्र सरकारचे टीकाकारसन २००९मध्ये सुरू झालेले ‘न्यूजक्लिक’ हे पोर्टल केंद्र सरकारचे कठोर टीकाकार म्हणून ओळखले जाते. काही काळापूर्वी या ‘न्यूज पोर्टल’वर चीनकडून निधी घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. ‘न्यूजक्लिक’ला अमेरिकन अब्जाधीश कादंबरी रॉय सिंघम यांनी वित्तपुरवठा केल्याचे वृत्त अमेरिकन वृत्तपत्र ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने पाच ऑगस्ट रोजी दिले होते व चिनी प्रचाराला चालना देण्यासाठी भारतासह जगभरातील संस्थांना हे सिंघम निधी देतात, असे यात म्हटले होते.

Pages