
लातूर: जिल्ह्यातल्या साठही मंडळात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. पीक विमा कंपनीने केवळ १० मंडळं पीक विम्यासाठी पात्र ठरवली आहेत. त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाली असून त्यांनी कृषी कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे. साठही मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा द्या अन्यथा चाबकांनी फोडून काढू असा इशाराही संघटनेने दिला आहे. यंदा कमी पाउस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तर आर्थिक हातभार लागावा या आशेने लातूर जिल्हयातील तब्बल ८ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. झालेही तसेच जिल्हयात पावसाचे दगा दिला अन् शेतशिवारातील पीक करपून गेली. कृषी विभाग अन् पीक विम्याचा कंपन्यांनी पंचनामे केले. दिवाळीपूर्वी पीक विम्याची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असे कृषी मंत्र्यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यातील साठही मंडळाला सरसकट पीक विमा देण्यात यावा,अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विमा कंपनीला दिल्या, मात्र आता कंपनीकडून केवळ १० मंडळं पात्र ठरवण्यात आलेत. त्यामुळे संतप्त शेतकरी संघटनेने कृषी कार्यालयासमोर ठिय्या मांडलाय. जोपर्यंत साठही मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मंजूर होत नाही तोपर्यंत उठणार नसल्याची भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे. जर शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळाला नाही तर कायदा हातात घेऊन चाबकाने फोडून काढू असा स्पष्ट इशाराही संतप्त शेतकरी रुपेश सुनाके यांनी दिला. लातूर जिल्ह्यातल्या साठही मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा देण्याची मागणी आम्ही केली आहे. मात्र, पीक वीमा कंपनीने छत्रपती संभाजीनगरच्या कृषी विभागाकडे अपील केले आहे. त्यामुळे या संदर्भात तिथे निर्णय घेतला जाईल. अशी महिती कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.दरम्यान, राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून पीक विम्यापोटी २५ टक्के अग्रीम रक्कम देण्यात येईल, असं सरकारनं म्हटलं होतं. मात्र, त्याची कंपन्यांकडून तातडीनं अंमलबजावणी होताना दिसत नाही. Read Latest And