ऑस्ट्रेलियाने ऐतिहासिक विजयासह पॉईंट्स टेबलमध्ये घातला धुमाकूळ, सेमीफायनलच्या शर्यतीत थाटात एन्ट्री - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 26, 2023

ऑस्ट्रेलियाने ऐतिहासिक विजयासह पॉईंट्स टेबलमध्ये घातला धुमाकूळ, सेमीफायनलच्या शर्यतीत थाटात एन्ट्री

https://ift.tt/PmcHxvr
नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाने बुधवारी नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव करत एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला. कांगारू संघाने एकूण एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत दुसरा सर्वात मोठा विजय नोंदवला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाचा हा सलग तिसरा विजय ठरला. पहिले दोन सामने गमावल्यानंतर या संघावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते मात्र आता या संघाने तीन विजयांसह पाकिस्तानसमोर अडचणी निर्माण केल्या आहेत. पॉइंट टेबलमध्येही गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.सेमीफायनलसाठी मजबूत दावा उपांत्य फेरीच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास पाकिस्तान संघाला उपांत्य फेरीसाठी पात्र होण्यासाठी उर्वरित चार सामने जिंकावे लागतील. याशिवाय त्यांना इतर संघांवरही अवलंबून राहावे लागणार आहे. त्यांपैकी भारत, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका अतिशय मजबूत स्थितीत आहेत. इंग्लंडची स्थिती खराब असली तरी सर्व सामने जिंकून टॉप फॉर गाठण्याची संधी त्यांच्याकडे आहे. पण त्यांची अवस्थाही पाकिस्तानसारखीच आहे. याचा अर्थ शेवटी पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाकडून स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते. ऑस्ट्रेलियाचे आता तीन विजयांसह ६ गुण झाले आहेत.गुणतालिकेत कोणते संघ कुठे?तर पाकिस्तानचे अजूनही केवळ चार गुण आहेत. म्हणजेच पाकिस्तानने सर्व सामने जिंकले तर कांगारू संघाच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागले. जर ऑस्ट्रेलियाने उर्वरित ४ पैकी चारही सामने जिंकले तर पाकिस्तानची अशीच अवस्था होईल. म्हणजे बाबरचे सैन्य आता कांगारू संघाच्या पराभवासाठी प्रार्थना करत असेल. सध्याच्या गुणतालिकेत भारत अव्वल, दक्षिण आफ्रिका दुसऱ्या आणि न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. या विजयासह ऑस्ट्रेलिया आता चौथ्या स्थानावर आहे पण त्यांचे ६ गुण आहेत. पाकिस्तानचा संघ ४ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.या संघांसाठी उपांत्य फेरीत जाणे अवघड!अफगाणिस्तानचेही पाच सामन्यांतून ४ गुण आहेत पण चांगल्या नेट रनरेटमुळे पाकिस्तान त्यांच्यापेक्षा वर आहे. अफगाण संघ सहाव्या स्थानावर आहे. याशिवाय श्रीलंका, इंग्लंड, बांगलादेश आणि नेदरलँडचे प्रत्येकी २ गुण आहेत. पण या पराभवानंतर नेदरलँड्स शेवटच्या म्हणजेच १०व्या स्थानावर आले आहेत. श्रीलंका सातव्या, इंग्लंड आठव्या आणि बांगलादेश नवव्या क्रमांकावर आहे. इथून एकही पराभव पाकिस्तानला उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर काढू शकतो. तर बांगलादेश आणि नेदरलँड्सच्याही उपांत्य फेरीच्या आशा जवळपास संपल्या आहेत.