नेदरलँड्सच्या विजयाने भारताला गुड न्यूज, पॉइंट्स टेबलमध्ये घडला सर्वात मोठा बदल... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 18, 2023

नेदरलँड्सच्या विजयाने भारताला गुड न्यूज, पॉइंट्स टेबलमध्ये घडला सर्वात मोठा बदल...

https://ift.tt/9FaKkhn
नवी दिल्ली : भगव्या जर्सीचा वर्ल्ड कपमध्ये विजय पाहायला मिळाला. नेदरलँड्सने या वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा धक्का दिला. कारण नेदरलँड्सचा संघ हा कमकुवत समजला जात होता. पण या सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत इतिहास रचला. पण या सर्व गोष्टींचा फायदा आता भारताच्या संघाला झाला आहे. कारण या सामन्यानंचतर वर्ल्ड कपच्या पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा संघ हा गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर होता, त्यांनी दोन सामने जिंकले होते आणि त्यांचे चार गुण झाले होते. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा रन रेट हा सर्वात उजवा होता. हा सामना जिंकून त्यांना सहा गुणांसह अव्वल स्थानावर जाण्याची संधी होती. दुसरीकडे भारतीय संघाने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या तीन संघांना पराभूत केले होते. त्यामुळे भारताच्या खात्यात तीन विजयांसह सहा गुण होते आणि ते अव्वल स्थानावर विराजमान होते. पण अव्वल स्थानावर या सामन्यानंतर कोणता संघ जाणार ते या निकालावर अवलंबून होते. कारण जर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विजय साकारला असता तर त्यांचे सहा गुण होणार होते. त्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांचे समान सहा गुण झाले असते, पण भारतापेक्षा रन रेट हा दक्षिण आफ्रिकेचा चांगला होता. त्यामुळे ते अव्वल स्थानावर विराजमान झाले असते. त्यामुळे या सामन्यात जेव्हा दक्षिण आफ्रिकेची ९ बाद १६६ अशी अवस्था झाली होती तेव्हा भारतीय चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा होता. कारण आता नेदरलँड्स विजयासाठी फक्त एकच पाऊल दूर होते. नेदरलँड्च्या संघाने विजय साकारला आणि भारतीय संघ अव्वल स्थानावर कायम राहीला. भारतीय चाहत्यांसाठी ही एक मोठी गुड न्यूज ठरली. दुसरीकडे नेदरलँड्सच्या संघाने आपले गुणांचे खाते उघडले आणि त्यांनी दोन गुणांची कमाई केली.भारताचा या पुढचा सामना गुरुवारी बांगलादेशबरोबर गुरुवारी होणार आहे. पण भारतीय संघ या सामन्यात जेव्हा उतरेल तेव्हा ते अव्वल स्थानावर असतील आणि या गोष्टीचा मानसीक फायदा नक्कीच त्यांना होऊ शकतो. त्यामुळे नेदरलँड्चा हा विजय भारताच्या चांगलाच पथ्यावर पडला आहे, असे दिसत आहे.