Pune News: ससूनमध्ये रोज १८ मृत्यू, क्षमतेपेक्षा अधिक रुग्णभरतीमुळे हॉस्पिटलवर ताण वाढल्याचा दावा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, October 6, 2023

Pune News: ससूनमध्ये रोज १८ मृत्यू, क्षमतेपेक्षा अधिक रुग्णभरतीमुळे हॉस्पिटलवर ताण वाढल्याचा दावा

https://ift.tt/A6TaUvP
तेजस टवलारकर, पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयातील आंतररुग्ण विभागात दिवसाला एक हजार ८० रुग्ण दाखल होत असून, दाखल रुग्णांपैकी दर दिवशी सरासरी १८ रुग्णांचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे. अनेकदा खासगी रुग्णालयात दाखल असलेला रुग्ण अत्यवस्थ झाला, की त्याला ससून रुग्णालयात दाखल केले जाते. त्यामुळे मृत्यू ‘ससून’मध्ये झाला, अशी नोंद केली जाते, असे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.शहरातील एका नामांकित रुग्णालयात एक रुग्ण गेल्या १५ दिवसांपासून उपचार घेत होता. मात्र, खर्च जास्त होत होता आणि रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणाही होत नव्हती. त्यामुळे या रुग्णाला ससून रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, ‘ससून’मधील अतिदक्षता विभागात जागा नव्हती; परंतु ‘या रुग्णाला दाखल करून घ्या,’ असा आग्रह नातेवाइकांकडून करण्यात येत होता, असे रुग्णालयातील एका डॉक्टरने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. अशा प्रकारचे रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण जास्त असल्याने रुग्णालयातील अतिदक्षता विभागात जागा मिळणे कठीण असते, असे येथील डॉक्टरांनी सांगितले.गेल्या काही वर्षांत शहराची आणि जिल्ह्याची लोकसंख्या वाढली. मात्र, त्या तुलनेत सरकारी रुग्णालयांची संख्या वाढली नाही. परिणामी, वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत ससून सर्वोपचार रुग्णालयातील सुविधा आणि मनुष्यबळ अपुरे पडत असल्याची स्थिती आहे. रुग्णालयाच्या क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखल होत असल्याने सर्वच विभागांत उपचार घेण्यासाठी रुग्णांना प्रतीक्षा करावी लागते. रुग्णालयात पुणे शहर, जिल्ह्यासह सांगली, सातारा, सोलापूर, नगर आणि राज्यभरातून येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे रुग्णालयावरचा ताण प्रचंड वाढल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे.आंतररुग्ण विभागातील दिवसाला दाखल रुग्ण१,०८०बाह्यरुग्ण विभागातील दिवसाला दाखल रुग्ण१,८७६आपत्कालीन विभागात दिवसभरात येणारे रुग्ण२२५आपत्कालीन विभागातील दिवसाला दाखल रुग्ण१८६दिवसाला डिस्चार्ज मिळणारे रुग्ण१६७दिवसभरात गंभीर शस्त्रक्रिया होणारे रुग्ण४३दिवसभरात किरकोळ शस्त्रक्रिया होणारे रुग्ण१०५दिवसभरातील अतिदक्षता विभागातील रुग्ण९९दिवसभरातील हृदयविकाराचे रुग्ण३०दिवसभरातील मृत्यू१८चार ऑक्टोबर रात्रीची रुग्णस्थितीआयसीयू प्रकार खाटा रिक्तमेडिकल २६ २ट्रॉमा केअर १६ ० नवजात बालकांचा १२ ०लहान मुलांचा ५९ ०रात्री दहानंतर येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्तपिंपरी-चिंचवड, मावळ, जिल्ह्यातील ग्रामीण भाग येथून रात्री दहानंतर येणाऱ्या गंभीर रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. परिणामी, अनेकदा जागेअभावी या रुग्णांना दाखल करण्यासाठी अडचणी येतात. रात्री साडेदहानंतर दिवसाला १५ ते २० रुग्ण येतात. दिवसभरात खासगी रुग्णालयातून २० ते २५ रुग्ण येतात.