भुयारी मार्ग पुन्हा बंद होणार! नवी मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागाचे पाऊल, कारण काय? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 18, 2023

भुयारी मार्ग पुन्हा बंद होणार! नवी मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागाचे पाऊल, कारण काय?

https://ift.tt/5Hugfax
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शीव-पनवेल महामार्गावर रस्ता ओलांडण्यासाठी नेरूळ एलपी, उरण फाटा या ठिकाणी भुयारी मार्ग ठेवण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या भुयारी मार्गांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असूनही येथे नेहमीच घाणीचे साम्राज्य असते. त्यामुळे पादचारी त्यांचा वापर करत नाहीत. तसेच, भुयारी मार्गात एखादा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानेही हा भुयारी मार्ग शटर लावून बंद केला होता. परंतु काही गर्दुल्ल्यांनी त्यांचे शटर उचकटून त्याचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे आता सुरक्षेच्या कारणास्तव हे भुयारी मार्ग पुन्हा बंद करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.- शीव-पनवेल महामार्गावर राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत ‘सायन-पनवेल टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला महामार्गाचे काम देण्यात आले होते. महामार्गाचे काम सुरू असताना पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग बांधण्यात आले होते.- या भुयारी मार्गाची अवस्था दयनीय झाली आहे. भुयारी मार्गात पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा नसल्यामुळे येथे पाणी साचले आहे. तसेच, कचऱ्याचे साम्राज्यही पसरले आहे. त्यामुळे येथे डासांची उत्पत्ती होऊन रोगराई पसरण्याची भीतीही व्यक्त होत आहे.- अस्वच्छतेमुळे पादचाऱ्यांनी या भुयारी मार्गांचा वापर करणे केव्हाच थांबवले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक बांधकाम विभागाने हे भुयारी मार्ग शटर लावून बंद केले होते. मात्र तरीही काही समाजकंटकांनी हे शटर उचकटून या भुयारी मार्गाचा वापर करण्यास सुरुवात केली होती. आता पुन्हा येथे शटर लावून भुयारी मार्ग बंद केले जाणार आहेत.- शीव-पनवेल महामार्गाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. नवी मुंबई महापालिकेने तसा फलकही लावला आहे.- राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिकासायन-पनवेल महामार्गावर रस्ता ओलांडण्यासाठी पादचाऱ्यांकडून भुयारी मार्गाचा वापर केला जात नाही. तसेच, या भुयारी मार्गामध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी ते बंद करण्यात आले आहेत. तरीही या मार्गाचा वापर होत असल्याचे आढळल्यास ते पुन्हा बंद केले जातील.- कल्याणी गुप्ता, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग